esakal | काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीपुढे एएमआयएमनंतर आणखी एक आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Political News Another challenge for Congress, NCP and deprived Bahujan Alliance after AMIM

येत्या वर्षभरात राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर १७ फेब्रुवारी २०२१ रोजी समाजवादी पार्टीच्या राज्यातील सर्व जिलाध्यक्ष व महानगराध्यक्षांची बैठक मुंबई आयोजित करण्यात आली होती. सपाचे प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या या बैठकीत सपाने अकोला महानगरपालिका क्षेत्रातील सर्व वार्डातून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीपुढे एएमआयएमनंतर आणखी एक आव्हान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : समाजवादी पार्टीने अकोला महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकी सर्वच वार्डातून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे एका विशिष्ट मतदारांच्या एकगठ्ठा मतांवर हक्क सांगणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसह वंचित बहुजन आघाडीपुढे एएमआयएमनंतर आणखी एक आव्हान उभे झाले आहे.

येत्या वर्षभरात राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर १७ फेब्रुवारी २०२१ रोजी समाजवादी पार्टीच्या राज्यातील सर्व जिलाध्यक्ष व महानगराध्यक्षांची बैठक मुंबई आयोजित करण्यात आली होती. सपाचे प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या या बैठकीत सपाने अकोला महानगरपालिका क्षेत्रातील सर्व वार्डातून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा - अजितदादा दिलेले आश्वासन पाळणार का?

पक्षाचे महमूद खान पठाण यांनी या संदर्भात अकोला शहर कार्यालयात बैठक घेवून मनपा निवडणुकीच्या तयारीबाबत पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. सर्वच वार्डात निवडून येण्याच्या तोडीचे उमेदवारांची यादी तयार करण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुंबईत झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष अबू असिम आझमी यांच्यासह प्रदेश महासचिव परवेझ सिद्दीकी, प्रदेश सचिव जफर अली, जुल्फिकार आझमी, अमरावतीचे सलीम जावेद खान यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख व महानगराध्यक्ष उपस्थित होते.
..........
गत निवडणूक होती पाटी कोरी
महानगरपालिका निवडणुकीत सर्व वार्डातून निवडणूक लढण्याची तयारी करीत असलेल्या सपाची २०१७ च्या मनपा निवडणुकीत पाटी कोरीच राहली होती. या निवडणुकीपूर्वी सपाचा काही वार्डात प्रभाव होता. मात्र, पक्षांतर्गत मतभेदामुळे पक्षाची मधल्या काळात मोठी वाताहत झाली. परिणामी पक्ष प्रभावहिन ठरत गेला. यावेळी मात्र सपाने गतवैभव पुन्हा मिळविण्याच्या उद्देशाने महमूद खान पठाण यांच्या नेतृत्वात जोमाने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे काँग्रेस, राकाँ व वंचित बहुजन आघाडीपुढे एएमआयएमनंतर सपाचे मोठे आव्हान उभे राहणार आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

 

Alert : आज रात्रीपासून ३४ तासांची संचारबंदी

 

आर.आर.आबा सुंदरगांव पुरस्कारात सावळा गोंधळ

 

जी.श्रीकांत गेले ; राहुल रेखावार महाबीजचे नवे एमडी

 

बुलाती है मगर जाने का नही, प्रतिष्ठीत पुरुषांना अडकविण्यासाठी रचला जातो हनी ट्रॅप

 

अकोला-अकोट रस्त्याचे काम सुरू न केल्याने प्रशासनाचे कठोर पाऊल

 

मळणी यंत्रात अडकला तरूण, गतिमंद भावासह विधवा आईवर कोसळला दुखःचा डोंग

loading image