नाना पटोलें यांनी करून घेतली माजी महापौरांची काँग्रेसमध्ये घरवापसी

Akola Political News Former mayor returns home to Congress by Nana Patole
Akola Political News Former mayor returns home to Congress by Nana Patole

अकोला :  काँग्रेसमध्ये महानगराध्यक्षांसह प्रदेश महासचिवपदापर्यंत काम करणारे भरगड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससोडून भारिप बहुजन महासंघात प्रवेश घेतला होता. भारिप-बमसंच्या तिकिटावर त्यांनी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूकही लढविली होती. मात्र, ते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षात फारकाळ रमले नाही.

धानसभा निवडणूक आटोपताच आणि अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आणखी एक वेगळी चूल मांडण्यासाठी आघाडीचा प्रयोग सुरू केला होता. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी मुंबईत त्यांची घरवापसी करून घेतली. भखरगड यांच्या पक्ष प्रवेशामुळे अकोल्यात काँग्रेस पक्ष संघटना अधिक बळकट होण्यास मदत होईल असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले.

यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष नसिम खान, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, चारुलता टोकस, आमदार वजाहत मिर्झा, मा. आ. हुस्नबानो खलिफे, सरचिटणिस व प्रवक्ते सचिन सावंत, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, अतुल लोंढे, संजय लाखे पाटील, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे, पर्यावरण सेलचे प्रदीप वर्तक आदी उपस्थित होते.

..........
दहा दिवसांपूर्वीच प्रवेशाची घाई का?
अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक ता. १० मार्च रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या निमित्तानेही मदन भरगड यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देता आला असता. मात्र स्थानिक नेत्यांच्या अनुपस्थितीत भरगड यांची घरवापसी झाल्याने हा प्रवेश घाईत का करण्यात याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com