ahmednagar 14 year riya kawade magical shows in 11 country Sakal
अहिल्यानगर

Success Story : 14 वर्षांच्या रियाचे 11 देशांत जादूचे प्रयोग

आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल; सर्वांत कमी वयाची जादुगार

दत्ता इंगळे

अहमदनगर: वय १४ वर्ष... प्रयोग ११ देशांत... सर्वात कमी वयाची जादुगार म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल... ही किमया साधली निमगाव पागा (ता. संगमनेर) येथील रिया कानवडे हिने. आपला शालेय अभ्यास करताना तिने केलेली ‘जादू’ कौतुकाचा विषय ठरला आहे.

लहान वयात मिळालेल्या बाळकडूचे संधीचे सोने करणारे अफलातून असतात. ग्रामीण भागात शिकून जागतिक पातळीवर सातासमुद्रापार जाणे कठीणच.

जादू केल्याप्रमाणेच ही छोटी जादूगार आता या क्षेत्रात राज्य करू लागली आहे. ती सध्या जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये (निमगाव पागा) इयत्ता दहावीत शिकत आहे. तिचे वडील भागवत कानवडे हे १७ वर्षांपासून जादूचे प्रयोग करीत असतात.

त्यामुळे तिला घरातूनच बाळकडू मिळाले. रियाने आतापर्यंत श्रीलंका, मालदिव, इंडोनेशिया, मलेशिया, तुर्की, बांगलादेश, थायलंड, व्हिएतनाम, कुवेत, नेपाळ यासह अकरा देशांच्या स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांक मिळविला. आता पर्यंत रियाला सहा महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेतून अनेक गुणवंत विद्यार्थी आयएएस, आयपीएस, आयआरएस तर झालेच, पण कलेच्या क्षेत्रातही रियाने संस्थेचा झेंडा सातासमुद्रापार नेला. रिया कानवडे हीने जगातील ११ देशातून आपले जादूचे प्रयोग सादर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर वाहवा मिळवली आहे.

- जी. डी. खानदेशे, सचिव, जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्था

मला बालपणापासून जादूची आवड होती. जादू बरोबरच मी इयत्ता दहावीचा अभ्यासही करते. वेळ मिळेल तसे नृत्यातही रमते. वडिलांकडून संभाषण कला शिकून घेतली. त्याचा उपयोग मला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयोग करताना होतो. जादूबरोबरच स्पर्धा परीक्षेची उत्तम तयारी करून आयएएस होण्याचा मानस आहे.

- रिया कानवडे, जादूगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT