अहिल्यानगर

5 एकर डाळिंबाचे झाले चक्क 65 लाख! शेतकरी तरुणाची कथा

सकाळ डिजिटल टीम

रिपोर्ट - तुळसीदास मुखेकर

तिसगाव (जि.अहमदनगर) : शिक्षण बीएस्सी अॅग्री. त्याने पुणे येथे कृषी आयुक्तालयात ७० हजार रुपये महिना असलेली नोकरी सोडली. एका तरुण शेतकऱ्याने ७० हजार रुपये महिन्याची नोकरी सोडून तो आता शेती करत आहे. आणि चक्क 9 लाख रुपये महिन्याला कमावत आहे. वाचा त्याचा थक्क करणारा प्रवास....

भोसे येथील तरुणाचा थक्क करणारा प्रवास...

भोसे (ता. पाथर्डी) येथील शशिकांत भरत शिंदे (वय ३९) या तरुणाचे शिक्षण बीएस्सी अॅग्री. त्याने पुणे येथे कृषी आयुक्तालयात ७० हजार रुपये महिना असलेली नोकरी सोडली. आपल्या वडीलोपार्जित असलेल्या १६ एकर जमिनीवर पारंपरीक बाजरी, ज्वारी, हरबरा आदी पिकांना फाटा देत फक्त फळबाग लागवड केली. त्यामध्ये पाच एकर डाळींब, पाच एकर संत्रा व पाच एकर सिताफळ लागवड केली आहे. उरलेल्या एक एकरवर एक कोटी लिटर पाणी साचेल एवढे शेततळे तयार केले आहे. पाच एकर जमिनीत तीन हजार डाळिंबाची झाडे आहेत. मागील वर्षी ७० टन डाळींब विकले. त्याचे सुमारे ५८ लाख रुपये आले होते. या वर्षी माल जादा आहे, तरीही ७० टन गृहीत धरला, तर या वेळी ११५ रूपये किलो असा दर आहे. सुमारे ७० लाख रुपये होणार आहेत. खर्च पाच लाख रुपये वजा जाता निव्वळ नफा फक्त डाळिंबामध्ये ६५ लाख रुपये वार्षिक होतो. संत्रा बागेची ८०० झाडे आहेत. त्याचे मागील वर्षी ५०टन माल आला होता. ३८ रुपये प्रति किलो भाव मिळाला. त्याचेही १९ लाख रुपये आले होते. गोल्डन सिताफळ आहेत. त्याचे खर्च वजा जाता १३ लाख रुपये वर्षाकाठी येतात. योग्य नियोजन केल्यामुळे शिंदे हे वर्षात एक कोटी रुपये शेतीतून मिळवत आहेत.

७० हजारांची नोकरी सोडून कमवितो महिन्याला नऊ लाख

शिंदे याचे फळपिक घेतानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते वर्षातून एकच पिक घेतात. आंबे बहार धरतात, मात्र तो थोडा उशीरा धरतात. कारण त्यावेळी बहुतेक शेतकऱ्यांचा माल संपत आलेला असतो. संत्रा हे पिक कमी कष्टात व कमी खर्चात घेता येते, पण पाणी जादा लागते. पाथर्डी हा कायम दुष्काळी असल्याने कमी पाण्याचे पिक घेण्यात येते. त्यामुळे डाळिंबाला पसंती असते. शेतीचे बहुतांश कामे ते स्वतः करतात. त्याला भाऊ व वडील मदत करतात. गरजेपुरतेच मजूर लावतात. स्वतः काम करत असल्याने बागेत होणारा बदल त्यांच्या लक्षात येतो. काय कमी पडले किंवा जादा झाले, हे जाणून ते पुढची दिशा ठरवतात.

फळपीक हे कमी पाण्यात कमी कष्टात जादा उत्पन्न देते. तरुणांनी प्रयोगशिल शेतकरी बनत फळ पिकाकडे वळावे. नोकरीची गरज पडणार नाही. - शशिकांत शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT