The forest at Savargaon Tal caught fire on Wednesday night 
अहिल्यानगर

सावरगाव तळ येथे जंगलाला भीषण आग; 10 हेक्‍टर क्षेत्रावरील वनसंपदेचा ऱ्हास

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर (अहमदनगर) : तालुक्‍यातील सावरगाव तळ येथील जंगलाला बुधवारी रात्री आग लागली. यात दहा हेक्‍टर क्षेत्रावरील वनसंपदा जळाली. स्थानिक ग्रामस्थांनी वेळेत आग आटोक्‍यात आणल्याने हजारो एकर क्षेत्र वाचले.

पोलिस पाटलांविनाच चाललाय ७०० गावांचा कारभार
 
सावरगाव तळ येथे आठशे एकर वनक्षेत्र आहे. स्थानिक ग्रामस्थ व वन विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती विकसित झाली. विविध औषधी वनस्पती व वृक्षराजीसह जंगली प्राणी, पशू-पक्ष्यांचा या ठिकाणी मोठा वावर आहे. स्थानिक ग्रामस्थ व वन विभागाने यासाठी सातत्याने प्रयत्न केले. बुधवारी (ता. तीन) रात्री साडेआठच्या सुमारास येथील डोंगर क्षेत्रावरील काही भागातील जंगलाला अचानक आग लागली. पाहता पाहता या वणव्याने उग्र रूप धारण केले.

गावातील अनेक तरुणांनी आगीची, वणव्याची माहिती पोलिस पाटील गोरक्ष नेहे आणि सरपंच दशरथ गाडे यांना कळविली. नेहे यांनी तातडीने वन विभागाचे अधिकारी व तहसीलदारांना कळविले. दोनशे ते अडीचशे युवक वणवा विझविण्यासाठी जंगलाच्या दिशेने धावले. वनक्षेत्रपाल नीलेश आखाडे, वनपाल रामदास डोंगरे, शेखर पाटोळे, वनरक्षक चैतन्य कासार, गजानन पवार, अरुण यादव, पुनाजी मेंगाळ, काशिनाथ दुधवडे यांचे पथकही घटनास्थळी मदतीसाठी पोचले. 

तहसीलदार अमोल निकम, पोलिस पाटील, वन विभागाचे अधिकारी वणवा विझविण्यासाठी प्रयत्न करीत होते. जवळपास दहा हेक्‍टरवरील वनसंपदा जळून गेली असली, तरी स्थानिक तरुणांमुळे उर्वरित वनसंपदा वाचविण्यात यश आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revati Sule : लेकीचं लग्न होणार, सुप्रिया सुळेंनी दोघांचा फोटो शेअर करत म्हटलं, सांगायला आनंद होतोय

Post Office Scheme : बँक FD विसरा! पोस्ट ऑफिस स्कीम देणार सुरक्षित 60 हजार रुपयांची हमखास कमाई; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Promise Day 2026: शब्दांच्या पलीकडलं एक नातं, जिथे वचनच सर्वस्व होतं: जाणून घ्या प्रॉमिस डेचं महत्त्व

Best Recharge : तीन एकदम जबरदस्त रिचार्ज प्लॅन; 28 दिवसांपर्यंत फ्री सर्विस, 96GB एक्स्ट्रा डेटासह फ्री टीव्ही चॅनेल्स

Gold Investment Returns : गुंतवणूकदारांची चांदी! सोन्याने गाठला पावणेदोन लाखांचा टप्पा, तर चांदी चार लाखांच्या पार; दीड महिन्यातच मिळाला 15 ते 34 हजारांचा परतावा

SCROLL FOR NEXT