Former Zilla Parishad vice president Anna Shelar is also keen to contest the Zilla Bank elections.jpg
Former Zilla Parishad vice president Anna Shelar is also keen to contest the Zilla Bank elections.jpg 
अहमदनगर

श्रीगोंदा तालुक्यात जगताप-नागवडेंसह अण्णाही उतरणार मैदानात

संजय आ. काटे

श्रीगोंदे (अहमदनगर) : ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णा शेलार हेही जिल्हा बॅंक निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. विशेष म्हणजे, ते महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. माजी आमदार राहुल जगताप हे सेवा संस्था, तर जिल्हा परिषद सदस्य अनुराधा नागवडे महिला मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. आता शेलार ओबीसी मतदारसंघातून आघाडीकडे उमेदवारीसाठी 'फिल्डिंग' लावून आहेत. 

जिल्हा बॅंकेची निवडणूक महिन्यावर आलेली असताना, उमेदवारीसाठी दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. बॅंकेचे संचालक दत्तात्रय पानसरे पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्याविरुद्ध राहुल जगताप यांचीच उमेदवारी निश्‍चित मानली जाते. जगताप यांना नागवडे गटाचा पाठिंबा मिळेल. याबाबत दोन्ही नेत्यांची बैठक झाली असून, त्यादृष्टीने सगळी बोलणी झाल्याचे समजते.

शेतीमित्रांचे प्रस्ताव गेले मातीत, वर्षभरापूर्वीच संपली मुदत
 
दरम्यान, सेवा संस्था मतदारसंघातून जगताप, तर महिला मतदारसंघातून अनुराधा नागवडे यांच्या उमेदवारीचा प्रयत्न आहे. शिवाजीराव नागवडे यांच्या निधनानंतर सहकारात निर्माण झालेली पोकळी भरण्यासाठी अनुराधा नागवडे यांचा पर्याय असल्याचे बोलले जाते. शिवाय, जगताप व नागवडे यांच्याकडे दोन्ही सहकारी साखर कारखान्यांची सूत्रे आहेत. त्यामुळे बॅंकेत जाण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. हे दोन्ही नेतेही महाविकास आघाडीच्याच उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. 

दरम्यान, विखे समर्थक शेलार हेही आता ओबीसी मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना नागवडे व जगताप यांचाही पाठिंबा मिळण्याची शक्‍यता आहे. कारण, नागवडे कारखाना निवडणुकीत नागवडे यांच्याविरुद्ध शेलार उभे ठाकण्याची शक्‍यता आहे. बॅंकेच्या उमेदवारीसाठी त्यांना पाठिंबा देऊन नागवडे शेलार यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करू शकतात. दुसरीकडे खुद्द राजेंद्र नागवडे हेही बॅंकेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे समजते. सहकारी संस्थांमधून थकबाकी नसल्याचे दाखले मिळविण्यास त्यांनी सुरवात केल्याने, तेही उमेदवारी करण्याची शक्‍यता आहे. 

पंचायत समितीत मी कॉंग्रेसचा सदस्य आहे. विखे घराणे व आपले जवळचे संबंध असले, तरी सहकारात राजकारण नसते. त्यामुळे आपण महाविकास आघाडीकडूनच उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहोत. 
- अण्णा शेलार, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा; पोलीस ॲक्शन मोडवर

Gautam Gambhir: एका रनासाठी गौतम झाला 'गंभीर', थेट अंपायरवर भडकला अन्...; कोलकाता-पंजाब मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

उतावळा नवरा! लग्नाच्या दोन महिने आधीच मुलीच्या घरी गेला अन् गोंधळ घातला, पोलिसांनी थेट...

Entertainment News: "मी मेकअप रुममध्ये कपडे बदलत असताना..."; अभिनेत्रीनं सांगितला मालिकेत काम करताना आलेला धक्कादायक अनुभव

अयोध्येत बसमधून ९५ बालकांची CWC ने केली सुटका, सर्व मुलं ५ ते ९ वयोगटातील

SCROLL FOR NEXT