The members of Savargaon washed their feet by fetching water from the Ganges 
अहिल्यानगर

ऐकावं ते नवलच : गावकऱ्यांनी गंगाजल आणून धुतले नव्या कारभाऱ्यांचे पाय, कारण काय?

आनंद गायकवाड

संगमनेर ः भारतीय संसदेत प्रवेश करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नतमस्तक झाले होते. या त्यांच्या कृतीबाबत काहींनी टीकास्त्र सोडले तर काहींनी त्यांचे कौतुक केले. असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यात झाला आहे. संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ या गावातील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची चर्चाच सर्वत्र आहे. 

बिनविरोध निवडणुकीसाठी पोलिस पाटील गोरक्ष नेहे, संतोष फापाळे आणि डॉ. शंकर गाडे यांनी मुख्य समन्वयकाची भूमिका पार पाडली. त्यांना दोन्हीही गटातील सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सहकार्य केले.

या वेळी पाणी फौऊंडेशनचे राज्याचे मुख्य प्रशिक्षक संदेश कारंडे, विभागीय समन्वयक विक्रम फाटक, राजेंद्र जाधव, पोलिस पाटील गोरक्ष नेहे, वनपाल रामदास डोंगरे, विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शंकर गाडे, संतोष फापाळे, रवी नेहे, नामदेव थिटमे, पोपट थिटमे, राजाराम फापाळे, विलास नेहे, शंकर नेहे, हरीश्चंद्र नेहे, रावसाहेब थिटमे, परशराम नेहे, कारभारी गाडे, पत्रकार गोरक्ष नेहे, संदीप थिटमे, माधव नेहे, रमेश नेहे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

सर्व सदस्यांचे गंगाजलाने पाय धुतले. झाडाचे रोपटे भेट म्हणून देत, वनसंपत्तीच्या रक्षणात अग्रेसर असलेल्या ग्रामस्थांनी वृक्षलागवडीचा संदेशही दिला आहे. चुरशीच्या निवडणुकांमुळे गावात मोठ्या प्रमाणात गटातटाचे राजकारण होते. मतदानासाठी दारू व पैसा यांचा वापर झाल्याने व्यसनाधिनता वाढते. संस्कारांचा लोप होतो व गावातील सामाजिक सौहार्द कमी होवून त्याचा परिणाम विकास कामांवर होतो.

या गावाने मागील काळात जलसंधारण, मृदसंधारण आदींसह अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. राजकीय कटूता टाळून, दोन गटातील गावाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी 

हा आहे उद्देश

भारतीय संस्कृती व धर्मशास्त्रानुसार गंगाजलाला पवित्र मानले जाते. गावाच्या विकासाच्या वाटचालीत महत्वाचा पाया असलेल्या ग्रामसंसदेवर निवडून आलेल्या सदस्यांनी पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळात, पवित्र गंगाजलाप्रमाणे वागून, स्वार्थविरहीत विकासगंगा गावात आणावी या हेतूने, गुलाब पाकळ्या टाकलेल्या गंगाजलाने नवनिर्वाचित सदस्यांचे पाय धुवून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: परदेशातून येतोय भारताचा खजिना; 64 टन सोनं देशात, नेमकं काय घडलं?

World Cup 2025: W,W,W... सेमीफायनलमध्ये ड्रामा! इंग्लंडने शून्यावर गमावल्या तीन विकेट्स, द. आफ्रिकेची धारदार गोलंदाजी; पाहा Video

Mumbai Local Train: लोकल ट्रेनमधील मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय, प्रवाशांना मोठा दिलासा

Crime: धक्कादायक! आपच्या बड्या नेत्यावर बेछूट गोळीबार; माजी डीएसपींनी घडवलं कृत्य, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : कर्जमाफीवरुन मंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

SCROLL FOR NEXT