Holi of increased electricity bills in front of MSEDCL office on behalf of BJP and Kisan Morcha
Holi of increased electricity bills in front of MSEDCL office on behalf of BJP and Kisan Morcha 
अहमदनगर

भाजप व किसान मोर्चाच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर वाढीव वीजबिलांची होळी

आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : 100 युनिटपर्यंत घरगुती विज वापराचे विजबील पूर्वलक्षी प्रभावाने माफ करावे, तसेच शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे पूर्ण विजबिल माफ व्हावे तसेच दिवसा पूर्ण दाबाने 12 तास विज पुरवठा करावा, यासाठी विज वितरण कंपनीच्या नवीन नगर रोडवरील कार्यालयासमोर भाजप व किसान मोर्चाच्यावतीने विजबिल होळी आंदोलन करण्यात आले.

या वेळी बोलताना भाजपाचे शहराध्यक्ष अँड. श्रीराम गणपुले म्हणाले, कोरोनाकाळात मोदी सरकारने अन्न धान्य मोफत दिले. मात्र आघाडी सरकारने 100 युनिटपर्यंत घरगुती वीज मोफत देण्याचे आश्वासन न पाळून फसवणूक केली आहे. या तीन चाकी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने कोरोना काळात सर्व उद्योग धंदे, शेतीउत्पन्न बंद असतांना देखील बोगस वीज बिले पाठवून राज्यातील जनतेला फसविले आहे. अशा निष्क्रिय सरकार विरोधात भाजपने आंदोलन केले असून, यापुढील काळात शेतकऱ्यांनी वीज पंपासह घरगुती वीज बिल भरु नये. संगमनेर तालुक्यात वीज वितरण कंपनीने कनेक्शन कट केल्यास त्यांना धडा शिकवला जाईल असा इशारा दिला. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
विज वितरण कंपनीने कोरोना लॉकडाऊनच्या काळात वापरलेल्या घरगुती विजेच्या बिलाची आकारणी करताना, विजेच्या मीटर रिडींगप्रमाणे न करता, सरासरी पध्दतीने वाढीव बिले दिली आहेत. मार्च पासून विजेची बिले ग्राहकांना वेळेवर मिळाली नाहीत, त्यानंतर काही ठिकाणी 200 पट पठाणी व्याजाने आकारणी केली गेली असून, बिले न भरल्यास विजपुरवठा खंडीत करण्याची धमकी दिली जात आहे.

कोरोना तसेच अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे कफल्लक झालेला शेतकरीवर्ग वीजबील भरु शकत नाही. अशा परिस्थितीत कृषिपंपाचे वीज बिल पूर्णपणे माफ होणे गरजेचे आहे. महाआघाडी सरकारने सत्तेवर येताना आश्वासन दिल्याप्रमाणे 100 युनिटपर्यंत वापर असणाऱ्या सर्व घरगुती वापराचे वीजबिल पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्यात यावे. या भागात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचे वास्तव्य असल्याने, कृषीपंपासाठी दिवसा 12 तास व पूर्ण दाबाने विजपुरवठा करण्यात यावा. मागण्या मान्य झाल्याशिवाय शेतकरी, घरगुती ग्राहक यांनी बिल भरू नये असे आवाहन आंदोलकांनी केले आहे.

यावेळी डॉ. अशोक इथापे, अँड. श्रीराम गणपुले, सतिश कानवडे, मेघा भगत, अँड. श्रीराज डेरे, सुधाकर गुंजाळ, डॉ. महेंद्र कोल्हे, बुवाजी खेमनर, मधुकर वाळे, प्राजक्ता बागूल, संजय नाकील, सोमनाथ आरोटे आदिंसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT