nilwande  
अहिल्यानगर

उत्तर नगर जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न... निळवंडे कालवा दोन वर्षांत पूर्ण होणार 

सतीश वैजापूरकर

शिर्डी : निळवंडे कालव्यांच्या कामाची गती कायम ठेवण्यासाठी यापूर्वी केलेल्या 105 कोटी रुपयांच्या तरतुदीत कोणतीही कपात करायची नाही, मजूर नसले तरी यंत्रांचा वापर करून काम सुरू ठेवायचे, गरज पडल्यास आणखी निधी द्यायचा, पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण करायचे, असा निर्णय आज मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जलसंपदामंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस उपस्थित असलेले आमदार आशुतोष काळे यांनी ही माहिती दिली. 


बैठकीनंतर जयंत पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आमदार किरण लहामटे व गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एन. व्ही. शिंदे यांच्याशीही चर्चा केली. निळवंडे कालव्यांच्या कामासाठी राज्य सरकारने यापूर्वीच एकशे पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, कोरोना संकटामुळे जलसंपदाच्या सर्व प्रकल्पांच्या निधीत सत्तर टक्के कपात करण्यात आली. निळवंडेच्या निधीत मात्र कपात न करण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. 


निळवंडे कृतिसमितीचे पदाधिकारी प्रा. बाळासाहेब वर्पे यांनी सांगितले, की कालव्याच्या कामासाठी एकूण सुमारे अडीचशे कोटी रुपयांची गरज आहे. पुढील वर्षी उर्वरित रकमेची तरतूद झाली, तर जलसंपदामंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या दोन वर्षांत कालव्यांचे काम पूर्ण होऊन लाभक्षेत्रात पाणी येऊ शकेल. सुरवातीला कालव्याद्वारे पाणी आणून लाभक्षेत्रातील साठवणतलाव व बंधारे भरायचे व दरम्यानच्या काळात वितरिकांची कामे पूर्ण करायची, असे नियोजन आहे. 


आता पाणी येण्याची शक्‍यता : शेळके 
निळवंडे कृतिसमितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके यांनी सांगितले, की पुढील दोन वर्षांत निळवंडे कालव्यांची कामे पूर्ण करून लाभक्षेत्रात पाणी आणण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कटिबद्ध आहेत. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व आमदार आशुतोष काळे यांचेदेखील सहकार्य मिळते आहे. दुष्काळी टापूतील आमच्या तीन पिढ्या या पाण्याची वाट पाहून थकल्या. आता पाणी येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैताग आलाय, लोक विचारतायत, बायको विचारतेय...; भाजपच्या निष्ठावंताला अश्रू अनावर, उमेदवारी नाकारल्यास आत्मदहनाचा इशारा

Paradh News : दोन बांगलादेशीची स्वदेशात रवानगी; पोलिस ठाण्यात झाला होता गुन्हा नोंद

Latest Marathi News Live Update : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे शिवसेना प्रचार करण्यातून रडत पडले बाहेर

Winter Pregnancy Care: हिवाळ्यात गर्भातलं बाळही थंडी अनुभवतं! आई आणि बाळ सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Virat Kohli नवीन वर्षातही खेळणार विजय हजारे ट्रॉफीतील सामना, पण कधी आणि कोणाविरुद्ध? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT