Kisan Gawande, a four-year-old boy from Kombhalane village, cried when his bicycle caught fire.jpg 
अहिल्यानगर

आगीत जळालेल्या सायकलसाठी चिमुकल्या किसनने फोडला टाहो

शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : कोंभालणे गावातील ठाकर वस्तीचे चार घरे जळाली आहेत. त्यात चिमुकल्या किसन सदू गावंडे या चार वर्षाच्या बालकाची सायकल ही जळाली. आपले घर जळताना ते आगीचे लोट, तो धूर व त्यातील साहित्य, शेळ्या, धान्य, मोटार, सायकली सोबतच या चिमुकल्यांची छोटी सायकल जळाली. त्यामुळे किसन रात्र भर झोपला नाही. झाडाच्या पायथ्याशी बसून शेकोटी सोबत तोही आपल्या आई वडील आणि नातेवाईक यांच्यासोबत जागाच होता.  सकाळी ९ वाजता जळालेले साहित्य बाजूला करताना त्याने आपली सायकल शोधली. मात्र ती सायकल थोडी तापली असल्याने चटके बसत होते. त्याने आपल्या आईला पाणी आणायला लावून सायकलवर टाकले. तिला उभी केली. सायकलचे टायर सर्वच जळाल्याने त्याला अश्रू आवरता आले नाही. 

दादा मला आता सायकल? असे म्हणत तो सायकलवर डोके ठेवून ओक्साबोक्शी रडला. वडिलांनी त्याला घर झाले की सायकल देऊ अशी त्याची समज काढली. मात्र जोपर्यंत दुसरी सायकल आणणार नाही तोपर्यंत या सायकलीला मी माझ्याकडे ठेवीन असे सांगत सायकल घेऊन झाडाच्या सावली खाली जाऊन स्थिरावला. त्याच्या सोबत पूनम, सोनल, भावड्या, सागर ही पोरही मध्यभागी सायकल ठेवून बसली. आदिवासी ठाकर समाजाच्या रखमाबाई पथवे एकट्याच मात्र त्यांना साथ देण्यासाठी शेवताबई, शिवाजी पथवे, लालू, चंद्र भागा तिचे तीन मुले, सुनीता गावंडे, तिचे ५ मुले, युवराज व कमल गावंडे अशी २१ माणसे या चार घरात राहत होती. 

घटनेचे वृत्त कळताच माजी आमदार वैभव पिचड, तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन २५ हजार रोख, ताडपत्री किराणा साहित्य तर खिर विरे येथील दिनेश शहा यांनी भांडी दिली. वैभव पिचड यांनी घर उभारणीच्या कामासाठी भरीव मदत देण्याचे आश्वासन दिले. यावेळी पीडित कुटुंब धाय मोकलून रडत होते. तर कोंभलने ग्रामस्थांनी आर्थिक मदत देण्याचे कबूल केले. युवक काँग्रेसने किसनला नवी सायकल घेऊन दिली. मात्र त्याच्या जुन्या सायकलचे प्रेम पाहून उपस्थित भारावले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: चलो दिल्ली! मराठे दिल्लीत धडकणार, देशभरातील मराठ्यांना मनोज जरांगे करणार एकत्र

Election Commission Decision: बिहार निवडणुकीआधी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! आता 'EVM'वर दिसणार उमेदवाराचा रंगीत फोटो अन्...

Nano Banana AI 3D Video Prompt: मॉडेल इमेजेसनंतर आता 3D व्हिडिओ ट्रेंड, एका मिनिटापेक्षा कमी वेळात तयार करा खास व्हिडिओ

Latest Marathi News Updates : मीनाताई ठाकरे पुतळ्याचा अवमान, दोषींना अजिबात सोडले जाणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pre-Wedding Photoshoot: प्री-वेडिंग शूट करायचंय? मग साताऱ्याचं कास पठार आहे एक परफेक्ट ठिकाण!

SCROLL FOR NEXT