A fund of Rs 13 crore has been sanctioned for the repair of Godavari left canal, said MLA Ashutosh Kale 
अहिल्यानगर

गोदावरी डाव्या कालव्याच्या दुरुस्तीस तेरा कोटी निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव (अहमदनगर) : गोदावरी डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी तेरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. कर्मवीर शंकरराव काळे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाला ही अनोखी भेट दिल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली. तसेच, मतदारसंघातील खासगी रुग्णालयांत मोफत कोविड लसीकरण व घरोघरी सॅनिटायझर वाटप उपक्रमास प्रारंभ केला. 

कर्मवीर शंकरराव काळे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार अशोक काळे, पुष्पा काळे, चैताली काळे आदींनी कर्मवीर काळे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. कारभारी आगवण, नारायण मांजरे, पौर्णिमा जगधने, अर्जुन काळे, सुधाकर रोहोम, बाबासाहेब कोते, राधूजी कोळपे, दिलीप शिंदे, सुधाकर दंडवते यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून उपस्थित होते. 

आमदार काळे म्हणाले, अडचणीच्या काळात समाजासाठी धावून जाण्याची प्रेरणा कर्मवीर काळे यांच्या जीवनकार्यातून मिळते. याच प्रेरणेतून आम्ही काम करीत आहोत. गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 78 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला होता. डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी पहिल्या टप्प्यातील 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. उर्वरित निधी देण्याची ग्वाही जलसंपदामंत्री पाटील यांनी दिली आहे.' 

गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा, यासाठी आमदार आशुतोष काळे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासमोर त्यांनी हा प्रश्‍न प्रभावीपणे मांडून पाठपुरावा सुरू केल्याने पहिल्या टप्प्यात तेरा कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यामुळे डाव्या कालव्याचा बिकट झालेला प्रश्‍न मार्गी लागेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT