This is a result that gives energy to the workers and increases their enthusiasm, said MLA Radhakrishna Vikhe Patil 
अहिल्यानगर

उत्साह वाढविणारा निकाल : विखे

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी (अहमदनगर) : राहाता तालुक्‍यातील 25 पैकी 23 ग्रामपंचायतींवर आपल्या समर्थकांचे वर्चस्व कायम राहिले. गावनिहाय विकास आराखडा तयार करून स्थानिक गरजेनुसार प्राधान्यक्रमाने विकासकामे केली जातात. ग्रामपंचायतींपासून विधानसभेपर्यंतच्या सर्व निवडणुकांत जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी असते. या निवडणुकीच्या निकालात हेच चित्र दिसले. कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा, उत्साह वाढविणारा हा निकाल आहे, अशा शब्दांत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : नगरमध्ये रोहित पवारांची बल्ले बल्ले; विखे, राम शिंदेंना धक्का
 
विखे पाटील म्हणाले, तालुक्‍यातील सहा ग्रामपंचायती यापूर्वीच आम्ही बिनविरोध ताब्यात ठेवल्या. स्थानिक संदर्भ असलेल्या लोणी खुर्द ग्रामपंचायतीत वेगळा निकाल लागला. मात्र, बाभळेश्वर, हनुमंतगाव आणि जळगाव या तीन अतिरिक्त ग्रामपंचायतींवर आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झेंडा फडकावला. ही उत्साहजनक कामगिरी म्हणावी लागेल. बऱ्याच ग्रामपंचायतींत विरोधकांचे अस्तित्वदेखील जाणवले नाही. आमच्याच स्थानिक कार्यकर्त्यांत निवडणूक झाली. त्यामुळे निकाल काय लागणार, हे सर्वांनाच ठाऊक होते.

हे ही वाचा : भाजपची लक्षणीय पीछेहाट : थोरात
 
प्रत्येक गावासोबत आणि गावातील जवळपास प्रत्येक कुटुंबासोबत संपर्क ठेवण्याचा प्रयत्न असतो. कार्यकर्त्यांची संघटनात्मक बांधणी पक्की आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या बळावर एकतर्फी होतात. जनतेची साथ असल्याने हे शक्‍य होते, असे विखे पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : उद्या ठाकरेंचा विजयी मेळावा- वरळी डोममध्ये तयारी सुरु

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT