अहमदनगर

...आता लोकप्रतिनिधींनी भूमिका जाहीर करावी : खा. संभाजीराजे भोसले

प्रा. सुनील गर्जे

आमच्या समन्वयक समितीने मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली असून आता लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका जाहीर करावी, असे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले.

नेवासे (अहमदनगर) : मराठा समाजाला त्याच्या हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी माझा लढा आहे. आम्ही मोर्चे काढून समाजाला वेठीस धरणार नाही. न्यायासाठी आता राज्यातील छत्तीस जिल्ह्यात मूक मोर्चा काढणार आहेत. राज्यभर आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये. यासाठी राज्य सरकारने त्यांच्या असलेल्या मागण्या मान्य कराव्यात. मागण्या मान्य न झाल्यास आम्ही पुणे ते मुंबई पायी 'लाँग मोर्चा' काढणार असा इशारा देत "मी राजकारणासाठी बाहेर पडलो नाही तर मराठा समाजाला न्याय देण्याची माझी भूमिका आहे. आमच्या समन्वयक समितीने मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली असून आता लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका जाहीर करावी, असे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले. (MP Chhatrapati Sambhaji Raje Bhosale said that I did not go out for politics but my role is to give justice to the Maratha community)

मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या मागण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी (ता. १६) जून पासून राज्यव्यापी मूक आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शनिवार (ता. १२) रोजी दुपारी नेवासे व गंगापूर तालुका सीमेवर प्रवरसंगम-कायगाव गोदावरी पुलावर मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक दशरथ गव्हाणे, विनोद काळे, अविनाश शिंदे, गणेश राऊत, छावा'चे प्रदेश उपाध्यक्ष अशोक चव्हाण, दौलत देशमुख, करण गायकर, आप्पासाहेब कुर्हेकर, उद्धव काळे, संकेत चव्हाण, अंकुश काळे, अमित सावंत आदी उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींशी आपण चर्चा केली का? त्यांची भूमिका काय? यावर बोलतांना संभाजीराजे म्हणाले, "मी राजकारणासाठी बाहेर पडलो नाही तर मराठा समाजाला न्याय देण्याची माझी भूमिका आहे. आमच्या समन्वयक समितीने मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली असून आता सर्व लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका जाहीर करावी. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्यानंतर राज्य शासनाकडे पाच मागण्या केल्या आहेत. सारथी, अण्णासाहेब महामंडळ, नियुक्त्या, नोकऱ्या याबाबत मागण्या केल्या आहेत. या मागण्या सरकारी स्तरावर सुटण्यासारख्या आहेत. यासाठी सर्वोच्च न्यायालयाचीही गरज नाही.

मराठा आरक्षणाचा आंदोलन करणारे विनायक मेटेंसह विविध संघटनांना तुम्ही या आंदोलनात एकत्र करणार का ? याप्रश्नावर बोलतांना संभाजी राजे म्हणाले, "मेटेशी माझी तुलना करू नका, तेही आरक्षणासाठी लढत आहेत, इतर नेतेही लढत आहेत. मला त्यात ओढू नका, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे, त्यांना न्याय देणे हाच आपला उद्देश आहे.

दरम्यान या परिसरातपोलीस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखाली नेवासे पोलिसांनी तर पोलीस निरीक्षक सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर पोलिसांनी गोदावरी पुल परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता.

नेवासे तालुक्यात जोरदार स्वागत

हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी नागपूरहून कायगावकडे जात असताना खासदार संभाजीराजे यांचे पांढरीपूल, घोडेगाव, कांगोनी फाटा, वडाळा बहिरोबा, नेवासे फाटा, खडका फाटा, देवगड फाटा, प्रवरसंगम यासह आदी ठिकाणी फटाक्यांचीआतषबाजी करून स्वागत करण्यात आले.

(MP Chhatrapati Sambhaji Raje Bhosale said that I did not go out for politics but my role is to give justice to the Maratha community)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT