Notice to three employees due to private ISM appointment 
अहिल्यानगर

जिल्हा परिषदेत परस्पर भरती... तीनजणांना नोटिसा

दौलत झावरे

नगर  : जिल्हा परिषदेतील एका विभागातील अधिकारी त्यांच्या खासगी व्यक्तीकडून कामे करून घेत असल्याची बाब "सकाळ'ने समोर आणली होती. त्याची दखल घेत जिल्हा परिषद सामान्य विभागाने संबंधित विभागातील तिघांना नोटीसा बजविल्या आहेत. 

जिल्हा परिषदेतील एका विभागात अनेक वर्षांपासून खासगी व्यक्ती काम करीत होती. ही बाब "सकाळ'ने समोर आणली. त्याची दखल घेत, प्रशासनाने संबंधित विभागातील तीन कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेतील सामान्य विभागाने नोटीसा बजावून खुलासा मागविला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी ही माहिती दिली.


दरम्यान, तूर्त या व्यक्तीचे जिल्हा परिषदेत येऊन काम करणे बंद झाले आहे. मात्र, काही दिवसानंतर ती व्यक्ती पुन्हा जिल्हा परिषदेत दिसू शकते, अशी चर्चा आहे. 

दरम्यान, सर्व विभागांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी विभागप्रमुख असले, तरी कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सामान्य प्रशासनची आहे. असे असताना खासगी व्यक्ती अनेक दिवसांपासून कामकाज कशी करीत होती, असा सवाल उपस्थित होत आहे.

कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन काहीच साध्य होणार नाही. संबंधित व्यक्तीला कोणी नेमले? त्याचा पगार कोण देत होते, या प्रश्‍नांची उत्तरे सामान्य प्रशासन विभागाने घेऊन दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.  

खासगी व्यक्तीच्या नियुक्तीवर पदाधिकारीही अाक्रमक

जिल्हा परिषदेत बिनदिक्कत खासगी व्यक्ती येऊन कामकाज करीत असूनही त्याकडे जिल्हा परिषदेतील अधिकार्यांचे दुर्लक्ष झाल्याने पदाधिकार्यांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे ती व्यक्ती जिल्हा परिषदेत येऊ देऊ नये, असा मुख्य कार्यकारी अधिकार्यांचा आदेश असतानाही तो कसा येऊन कामकाज करीत होता, असा सवाल आता उपस्थित होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT