President of the factory Namdevrao Dhokne has said that action will be taken if Tanpur is defamed  
अहिल्यानगर

'तनपुरे'ची बदनामी केल्यास कारवाई करणार : ढोकणे

सकाळ वृत्तसेवा

राहुरी (अहमदनगर) : डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या ऑनलाइन वार्षिक सभेची नोटीस मिळाली नाही, सभा अवैध ठरवावी, अशी सभासदांच्या नावाने केलेली तक्रार खोटी आहे. अमृत धुमाळ यांनी सभासदांच्या बोगस सह्या करून, प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे तक्रार करीत सभासदांची दिशाभूल व कारखान्याची बदनामी केली आहे, असा आरोप कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांनी केला. 

'सकाळ' शी बोलताना ढोकणे म्हणाले, की अमृत धुमाळ यांनी बोगस सह्या करून, खोट्या तक्रारी करून कारखान्याचे मार्गदर्शक खासदार डॉ. सुजय विखे पाटील व मला त्रास देण्याच्या हेतूने कारखान्याची बदनामी चालविली आहे. त्यांनी उसाचे एक टिपरू कारखान्याला गळितास दिले नाही. कारखान्याच्या वार्षिक सभेत भाग घेण्यासाठी त्यांना कोणाचीही आडकाठी नाही. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे समर्पक व समाधानकारक उत्तर दिले जाईल; मात्र कारखान्याची विनाकारण बदनामी करू नये. 

एकूणच, वार्षिक सभेच्या पूर्वसंध्येला कारखान्याचे अध्यक्ष ढोकणे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे वार्षिक सभेकडे सभासदांचे लक्ष लागले.  

अमृत धुमाळ यांनी तक्रार अर्जात माझे नाव परस्पर टाकून बोगस सही केली आहे. वार्षिक सभेविषयी प्रादेशिक सहसंचालक (साखर), नगर यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जाशी माझा काडीमात्र संबंध नाही. 
- पंढरीनाथ पवार, माजी संचालक, डॉ. तनपुरे साखर कारखाना
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT