Rohit Pawar And Ram Shinde esakal
अहिल्यानगर

नियोजन की परिणाम?, भाजप नेते राम शिंदेंचा रोहित पवारांवर निशाणा

'मग याला काय समजावे.'

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : माजी मंत्री राम शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज आज गुरुवारी (ता.नऊ) दाखल केला. त्यांनी सोशल मीडियावरुन आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे नाव न घेता टीका केली आहे. शिंदे आपल्या पोस्टमध्ये लिहितात, की मी काल भाजपतर्फे विधान परिषदेसाठी अर्ज भरला. मी काल ( ८ जुनला ) भारतीय जनता पार्टीतर्फे विधान परिषदेसाठी फॉर्म भरला आहे. काल कर्जत-जामखेडमध्ये बहुतेक ठिकाणी पाऊस पडला. पावसाळा ( ७ जुननंतर ) सुरू झाला आहे. (Ram Shinde Criticize Rohit Pawar Over Kukadi Water Issue)

पण उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना कुकडीच्या आवर्तनाची गरज असताना पाणी सुटले नाही. परिणामी बरेच उभी पिके जळाली. फळबागाचे नुकसानही झाले. काही ठिकाणी बागा जळाल्या. पण काल असे समजले की कुकडीचे आवर्तन सुटणार आहे. मग याला काय समजावे. योगायोग, नियोजन की परिणाम? असे म्हणत राम शिंदे (Ram Shinde) यांनी अप्रत्यक्ष रोहित पवार यांची टीका केली.

कुकडीचे पाणी सोडावे यासाठी शिंदे यांनी आंदोलन केले होते. पण शेतीसाठी पाणी सोडलेच गेले नाही. मात्र बुधवारी भाजपकडून विधानपरिषदेसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि कुकडीचे आवर्तन सुटणार आहे असे समजले, असे शिंदे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शालेय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा शालेय पास आता लांबपल्ल्याच्या बसमध्येही चालणार; सोलापूर जिल्ह्यातून हेल्पलाईनवर सर्वाधिक तक्रारी

आजचे राशिभविष्य - 06 डिसेंबर 2025

Weekend Breakfast Recipe: वीकेंडला नाश्त्यात 'हेल्दी स्प्रींग रोल' ट्राय केले का? सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ग्रहमान : ६ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२५ - मराठी राशी भविष्य

Pune News : शीतल तेजवानीच्या घरझडतीत महत्त्वाची कागदपत्रे जप्त

SCROLL FOR NEXT