Rohit pawar E sakal
अहिल्यानगर

झिंग झिंग झिंगाट...रोहित पवारांचा कोविड सेंटरमध्ये डान्स!

सकाळ डिजिटल टीम

आमदार रोहित पवार रूग्णांच्या तब्येतीची चौकशी करीत होते. त्यावेळी ‘झिंगाट’गाणं लागलं. या आनंदी वातावरणात तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि रोहित पवारही त्यात सहभागी झाले.

अहमदनगर ः कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार (MLA Rohit pawar) यांनी जम्बो कोविड सेंटर उभारली आहेत. तब्बल दोन हजार या कोविड सेंटरची (Covid Centre) क्षमता आहे. गावोगाव कोविडची टेस्टिंग सुरू आहे. दोन्ही तालुक्यांत फिरता दवाखानाही सुरू आहे. कोरोनाशी लढू ना...असा संदेश देत ते काम करीत आहेत. बारामती अॅग्रोच्या वतीने त्यांनी दोन्ही तालुक्यांतील उपजिल्हा रूग्णालयासाठी मदत दिली आहे. (Rohit Pawars dance goes viral at covid Center)

कोविड व्यतिरिक्तही त्यांची कामे सुरू आहेत. प्रत्येक गावांत रूग्णांची विचारपूस केली जात आहे. कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथे एक हजार रूग्णांसाठी कोविड सेंटर उभारले आहे. तेथील रूग्णांचे मनोबल वाढावे यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जातात. काल त्यांनी स्वतःच रूग्णांची विचारपूस करतानाच झिंगाट गाण्यावर डान्स केला. त्यांच्यासोबत तेथील लहान मुले व आजीबाईंनीही डान्स केला. सोशल मीडियातून हा डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आमदार रोहित पवार व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था ही कोविड सेंटर चालवित आहे. रुग्णांचे मनोबल वाढावे तसेच त्यांना मनोरंजन म्हणून तुषार घोडके यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पवार रूग्णांच्या तब्येतीची चौकशी करीत होते. त्यावेळी ‘झिंगाट’गाणं लागलं. या आनंदी वातावरणात तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि रोहित पवारही त्यात सहभागी झाले.

या कोविड सेंटरमध्ये दररोज वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. रूग्णांसाठी सकस आहार दिला जातो. दानशूरही कोविड सेंटरसाठी मदत करीत आहेत. मागील आठवड्यात स्थानिक मुलींनी साहसी क्रीडा प्रकार सादर केला होता.

ट्विटमध्ये काय म्हणतात...

आमदार रोहित पवार यांनीही हा व्हिडिओ ट्विट केला आहे. “गायकरवाडी (कर्जत) येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या ‘झिंगाट’ गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि नकळत मीही त्यांच्यात सहभागी झालो”.

(Rohit Pawars dance goes viral at covid Center)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT