Strictly will not recover debts: koyate 
अहिल्यानगर

कमी दरात मिळणार व्याज.... कठोर वसुलीही नाही 

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्ह्यातील पतसंस्था कोरोनाच्या संकटात अतिशय सेवाभावी वृत्तीने ग्राहकांना सेवा देत आहेत. विशेषतः लॉकडाउनमध्ये पतसंस्थांनी ग्राहकांना घरपोच बॅंकिंग सेवा दिली. हजारो गरजूंना मदतीचा हातही दिला. पतसंस्थांच्या ठेवींमध्ये किमान 5 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. पतसंस्थांनी ठेवींवर 9 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक दराने व्याज देऊ नये, तसेच लॉकडाउन वाढल्यास पतसंस्थांनी कठोरपणे कर्जवसुली न करण्याचा निर्णय घेतल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी सांगितले. 

जिल्हा सहकारी स्थैर्यनिधी संघ व जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांच्यातर्फे स्थैर्यनिधी संघाच्या संचालक मंडळाची बैठक जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर कोयटे पत्रकारांशी बोलत होते. स्थैर्यनिधी संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश वाबळे, उपाध्यक्ष वसंत लोढा, विशेष लेखापरीक्षक राजेंद्र निकम, तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सबाजी गायकवाड, शिवाजी कपाळे, वासुदेव काळे, वसंत पवार, सुशीला नवले, उमेश मोरगावकर, आदिनाथ हजारे, किसन लोटके आदी उपस्थित होते. 

उपनिबंधक आहेर म्हणाले, ""लॉकडाउनमध्ये सहकार खात्याने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. या काळात राज्यातील पतसंस्थांना वार्षिक सभा घेण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही, तसेच लाभांशवाटपही होणार नाही.'' 
प्रास्ताविकात सुरेश वाबळे म्हणाले, की लॉकडाउन काळात जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्यनिधी व नाशिक विभागातील सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिक विभागातील सहकारी पतसंस्थांची बैठक झाली. तीत पतसंस्थांचे प्रश्न समजून घेतले, त्याचबरोबर पतसंस्थांना संकटकाळात दिलासा देण्याचे काम केले. त्यामुळे एकही पतसंस्था अडचणीत आलेली नाही. यापुढे सर्व पतसंस्थांनी ठेवींवर एकसमान व्याजदर दिला, तर आपापसांतील स्पर्धा कमी होईल. 
वसंत लोढा म्हणाले, की कोरोनामुळे छोटे व्यवसाय बंद पडल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी जिल्ह्यातील पतसंस्था तातडीने 10 हजार ते एक लाखापर्यंतचे तातडीचे कर्ज मंजूर करून भांडवल उपलब्ध करून देणार आहेत.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane Politics: मराठीचा मुद्दा चिघळला; मनसे महिला पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

SCROLL FOR NEXT