Three vehicles have been fined for illegal uptake in Shevgaon.jpg 
अहिल्यानगर

अवैध उपसा केल्याप्रकरणी तीन वाहनांवर दंड; अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले

सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर)  : गौणखजिनाचा अवैध उपसा करुन वाहतूक केल्याप्रकरणी महसूल विभागाच्या पथकाने तालुक्यातील दिंडेवाडी येथील एक जेसीबी, दोन ट्रॅक्टर पकडून त्यांना सुमारे ९ लाख ७० हजार रुपयांचा दंड करण्यात आला. ही कारवाई गुरुवार (ता.५) रोजी मंडलाधिकारी रमेश सावंत यांच्या पथकाने केली. याबाबत पंचनामा करुन वाहन मालकांना नोटीसा काढण्यात आल्या आहेत. बेकायदेशीर रित्या मुरुम, वाळू आणि डांबर यांचा अवैध उपसा करणा-यांविरुध्द धडक कारवाई करण्यात येत असल्याने अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिस पाटलांविनाच चाललाय ७०० गावांचा कारभार
 
तहसिलदार अर्चना भाकड-पागिरे, नायब तहसिलदार मयूर बेरड यांनी तालुक्यातील गौण खनिजाचा बेसुमार उपसा करणा-यांविरुध्द धडक मोहिम सुरु केली आहे. त्यानूसार दिंडेवाडी (ता. शेवगाव) शिवारात जेसीबी क्रमांक एम.एच १६ ए.व्ही ५१६८ च्या सहाय्याने विहीरीवरील अवैध मुरुमाचे उत्खनन करुन ते ट्रॅक्टर क्रमांक एम एच १६ ए.एम ९२६७ व एक विनानंबरचा ट्रॅक्टरमध्ये भरुन वाहतूक करताना आढळून आले. त्यामुळे जेसीबीसाठी ७ लाख ५० हजार तर दोन  ट्रॅक्टरसाठी प्रत्येकी १ लाख १० हजार असा सुमारे ९ लाख ७० रुपये दंड करण्यात आला. 

यासंदर्भात जेसीबी मालक शिवाजी गोरक्ष दिंडे, ट्रॅक्टर मालक ठकाजी नेहाबा दिंडे व हनुमंत आप्पासाहेब दिंडे राहणार दिंडेवाडी (ता. शेवगाव) यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. ही कारवाई तहसिलदार भाकड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलाधिकारी रमेश सावंत, तलाठी चंद्रकांत गडकर, अमोल कचरे, प्रदीप मगर, अमर शेंडे, किशोर पवार आदींच्या पथकाने केली.

तालुक्यातील जमीन महसुलातून एक कोटी ४० लाख २७ हजार तर गौण खनिजातून दोन कोटी ६८ लाख ४६ हजार असा सुमारे चार कोटी ९ लाख १३ हजार रुपये महसूल वसूल करुन शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. गौण खनिजाचा अवैध उपसा करणा-यांवर जरब बसवण्यासाठी व शासनाच्या तिजोरीत भर टाकण्यासाठी ट्रक्टर, जेसीबी, डंपर मालकांवर कारवाई करण्यात येत आहे.  
- अर्चना भाकड-पागिरे, तहसिलदार, शेवगाव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case : आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातल्या आणखी चौघांना अटक, हत्येनंतर गुजरातला झालेले फरार

Latest Marathi News Updates: पाकिस्तानच्या ग्रुपवर चॅट करण्याचं प्रकरण, नागपूरमधील दोघांची एटीएसकडून चौकशी

Besan Cheela Vs Oats Cheela: वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात बेसन चीला की ओट्स चीला फायदेशीर? वाचा एका क्लिकवर

Sinhagad Road : माणिकबाग परिसरात महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक कारवाई

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT