Vegetable farmers in financial crisis due to lockdown 
अहिल्यानगर

लॉकडाउनमुळे भाजीउत्पादक शेतकरी आर्थिक संकटात 

मार्तंड बुचुडे

पारनेर : लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांना शहरात भाजीपाला पाठविणे अवघड जात आहे. त्यातच आता ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने छोट्या-मोठ्या बाजारपेठाही बंद आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना भाजीपाला कोठे विकावा असा प्रश्‍न पडला आहे. राज्यात व देशात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे शहरातील मोठ्या बाजारपेठा बंद आहेत. तसेच वाहतूकही फारशी सुरळीत झाली नाही. त्यामुळे शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याचे काय करायचे, या चिंतेत सध्या शेतकरी आहेत. 

सध्या शेतकरी कमी प्रमाणात भाजीपाला करतात. घरी खान्यापुरता भाजीपाला केल्याने अनेकांना बाजारपेठेत जाण्याची वेळ येत नाही. यापूर्वी थोड्या प्रमाणात पिकविलेला भाजीपालाही शेतकरी गावातील किंवा आसपासच्या आठवडे बाजारांत बसून विक्री करून घरचा आठवड्याचा चरितार्थ चालवत असत. मात्र, आता तीन महिन्यांपासून खेड्यापाड्यांत भरणारे आठवडे बाजारही बंद आहेत. तसेच कोरोनामुळे अनेक गावेही बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची खेड्यापाड्यांत जाऊन भाजीपाला विकण्याची असलेली सोय बंद झाली आहे. मोठ्या शहरांबरोबरच परिसरातील बाजार बंद झाले आहेत. शहरात कोरोनाने थेट छोट्या गावात व ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. त्यामुळे भाजीपाला विकण्यावर मोठी बंधने आली आहेत. 

दुधालाही बाजारभाव नाही. त्यामुळे दूधउत्पादक अडचणीत आहेत. शेतात थोडा-फार भाजीपाला पिकविला जातो तो कोठे विकावा, असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे. भाजीपाल्याला गावात गिऱ्हाईक मिळत नाही व शहरात पाठविता येत नाही. त्यामुळे भाजीपाला उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. अहमदनगर 


मी एक एकर फ्लॉवर केला होता. तो कसा तरी दोनशे ते अडीचशे रुपये पोत्याने विकला. झालेला खर्चही मिळाला नाही. आता तर सव्वा एकरात बंजारा मिरची केली आहे. ती 15 ते 20 रुपये किलोने विकावी लागली. त्यातून तोडणीचा खर्चही भागत नाही. लॉकडाउनमुळे शेतमाल व भाजीपाला विक्रीची मोठी अडचण झाली आहे. शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. 
- नामदेव तानवडे, शेतकरी, वाडेगव्हाण 

 

 

 

संपादन - सूर्यकांत वरकड 
..... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT