Vijay Bankar has cast his vote by traveling from Baramati to valan bicycle.jpg 
अहिल्यानगर

बारामतीचे मतदार आले वळणला, सायकलवर येत बजावले कर्तव्य

विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळपासून उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेल्या एका मतदाराने चक्क सायकलवरुन रपेट मारली. बारामती ते वळण १८० किलोमीटरचा सायकल प्रवास करून, ९ तास ३३ मिनिटात गाव गाठले. मतदान अधिकाराच्या कर्तव्याची जाणीव व सायकलींग व्यायाम असा दुहेरी संदेश देऊन, तरुणाने जनजागृती केली. ग्रामस्थांनी सत्कार, स्वागत करून, तरुणाचे कौतुक केले.

विजय भाऊसाहेब बनकर (वय ३८, रा. वळण) असे या तरुणाचे नाव आहे. ते बारामती येथे एका कंपनीत नोकरीमुळे स्थायिक झाले. परंतु, मूळगावी वळण येथे त्यांच्या आई व भावाचे कुटुंब राहते. मतदानाच्या कर्तव्याबरोबर आईचे तिळगुळ घेण्याचा योग जुळून आल्याने, बनकर यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता बारामती सोडली. सायंकाळी सात वाजता १८० किमीचा सायकल प्रवास करून, वळण येथे घर गाठले. त्यांचे कुटुंबाप्रती असलेले प्रेम, मतदानाच्या अधिकाराची जाणीव व सायकलींगची आवड ग्रामस्थांना भावली. गावात पोहोचल्यावर ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून स्वागत केले.

तालुक्यात ४४ ग्रामपंचायतींच्या १६८ पैकी ८ मतदार केंद्रांवरील उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. ४१८ पैकी ५६ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे, उर्वरित ३१२ सदस्यांच्या निवडीसाठी १६० मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजल्यापासून शांततेत मतदान सुरू झाले. पहिल्या दोन तासात सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत एकूण ९० हजार ३९२ पैकी ११ हजार ३१८ (१२.५२ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात एकही ग्रामपंचायत संवेदनशील घोषित नाही. तरी, पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Metro: ठाणे मेट्रो कधी सुरू होणार? प्रताप सरनाईकांनी 'ती' वेळच सांगितली! तारखेबाबत मोठी अपडेट समोर

Nashik Nomokar Teerth : कुंभमेळ्याच्या धर्तीवर 'णमोकार तीर्था'चे नियोजन; हेलिकॉप्टर सेवेबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या सूचना

Thane Politics: भाजप–राष्ट्रवादी–शिवसेना... ७२ तासांत बदलले तीन पक्ष; राजकीय नेत्यांचा वेगवान ‘यू-टर्न’, मतदार राजाही संभ्रमात

Post Office Scheme : १ लाख गुंतवा अन् ४५ हजार व्याज मिळवा! २०२६ मधील पोस्ट ऑफिसची मालामाल करणार FD योजना, Money Saving नक्की वाचा

Latest Marathi News Live Update : अफवावर विश्वास ठेवू नका, अजित पवारांचा उमेदवारांना कानमंत्र

SCROLL FOR NEXT