अकोले: कोरोनामुळे संपूर्ण देशातच लोक आरोग्य व्यवस्थित राहावे म्हणून सतर्क झाले आहेत. त्यात हृदयविकार, मधुमेह, किडनी, त्वचारोग, कॅन्सरचे रुग्ण भयभीत अाहेत. त्यांनी न घाबरता वेळेवर निसर्ग संपत्तीत वाढणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींचे सेवन केल्यास आजार नियंत्रणात येऊन हळूहळू तुमच्या शरीरातून बाहेर जातील.
जसे कोरोनाबाबत आपण सतर्क आहेत तसेच इतर आजाराबाबतही राहिला तर स्वस्थ राहाल. निसर्गात तेवढी फळे व वनस्पती आहेत. आदिवासी दुर्गम भागात भूमी आवळा सापडतो.या आवळ्याच्या सेवनाने लिव्हरला आलेली सूज,सोरायसिस, चरबी,हेपेटायटीस बी व सी किडनीमध्ये वाढल्यास, मुधेमहअति प्रमाणात असल्यास हा भूमी आवळ्याचा रस घेतल्यास तुमचा रोग बरा होतो.
हेही वाचा - मिलिटरीतून रजेवर आला नि डायरेक्ट चोरच झाला
वर्षातून सतत महिनाभर घ्या नि आजार पळवा असा सल्ला वनस्पती तज्ञ डॉ भाऊराव उघडे देतात.पावसाळ्यात ही वनस्पती उपलब्ध असते.पाण्याचे व सावलीच्या ठिकाणी ती वर्षभर उपलब्ध होते.
भुई आवळा ः विविध भाषेतील नांवे :-गुजराती , भोय आम्ली .तामिळ , किला नेल्ली . तेलगू , नेल निल्ली , नेल्ला उसिरिका , नेला वुसारी . बंगाली , भुई आम्ला. बिहारी , कांतारा , पिरी कांतारा , भुई आरा , मुई कोआ . मराठी भुई आवळी. मल्याळम , कीझा नेल्ली , किर्गा नेल्ली .संस्कृत , बहुपत्री , भूम्यामलकी, भूम्यामलिका .सिंधी , निरुरी , भुईआवला .हिंदी , जंगली आम्ली , भुईभरा , जराम्ला भोन्यबली.
या झाडाची उंची साधारण ६०सेंमी, खोड कोन असलेले, पाने एकासमोर एक अश्या दोन उभ्या रांगात लंबगोल आयाताकृती किंव्हा एकघाती आयाताकृती चिंचेच्या पानासारखी. फुले पानाच्या बगलेतून येतात. रंग पिवळट हिरवा किंव्हा पिवळट पांढरा. फळे दबलेली गोल बोंडे .जे आवळयासारखी दिसतात. या झाडाला कार्तिक महिन्यात संग्रह करुन ठेवावा लागतो .
ही औषधी चवीला कडु असते.ती मूत्रल , दीपक , स्तंभक , रेचक , ज्वरनाशक आहे .अपचन , हगवण , आमांश , जलसंचय , व मूत्ररोग यांवर गुणकारी आहे .आईचे दूध वाढवण्यासाठी मूळया दुधातुन घेतात.पानाचा अर्क डोके थंड ठेवण्यासाठी वापरतात .पाने व मूळया भाताच्या पेजेत बनविलेले पोटिस जलसंचयी सूज व व्रण यांवर वापरतात.
पंचांगाचा काढा बनवुन पिल्याने लघवी खूप प्रमाणात होवून जलोदर रोग नाहीसा होतो .याची मुळीचे चूर्ण ५ ग्राम तांदळाच्या पाण्यासोबत दिवसातून तीन वेळा घेतल्याने रक्तप्रदर तीन चार दिवसात समाप्त होतो.
भुई आवळयाच्या प्रयोगाने कावीळसारखा आजार काही दिवसात मुळासकट नाहीसा होतो.तो कोणत्याही प्रकारचा कावीळ असो..डोळे नखे व अंग पिवळे झाले असेल तरीही यांच्या सेवनाने लवकर आराम मिळतो.
जाणून घ्या - बायकोसोबत तिच्या मित्राला पाहिलं अन
पाने फांदीसह ५ ते १० ग्राम घेवून बारीक वाटून घ्यावी आणी एक ग्लास गायीच्या दुधात ५ ते १० मिनिटे उकळून घावी व थंड झालेले दुध काहीही न टाकता (साखर )सकाळी उपाश्यापोटी फक्त एक वेळा .लगातार सहा दिवस पिल्याने सर्व प्रकारच्या कावीळात आराम होतो .सहा दिवसानंतर बिलुरुबिन तपासणी करुन घ्यावी .या दरम्यान आंबट, तेल , तळलेले पदार्थ , मिर्च मसाले व थंड पदार्थ खाऊ नये,वर्ज्य करावे .फळांचा रस , उसाचा रस , उकडलेले अन्न , व दुध घ्यावे.
भुई आवळा , दालचिनी , वेलदोडा , तमालपत्र , २० मिरी एकत्र वाटुन सात घेतल्यास प्रमेह रौगात आराम पडतो .
भुई आवळयाची मूठभर पाने , डाळिंबाचे मूठभर पाने लिंबाच्या रसात रात्रभर भिजत सकाळी कोळून घ्यावा , नंतर त्यात थोडे कवडीभस्म घालुन तो रस सकाळ संध्याकाळ या प्रमाणे सात दिवस घ्यावा .याचा उपयोग पंडूरोग, जीर्णज्वर, खोकला यांवर होतो.
पंचांगाचा क्वांथ घेतल्याने हिवताप, यकृतवृध्दी ,
प्लीहावृध्दी , शौचास साफ होण्यासाठी लाभदायक आहे .
पिवळ्या परम्यावर भुईआवळयाचा अंग रस दोन तोळे व तितकेच साजूक तूप घालुन सकाळ संध्याकाळ घेतल्याने आराम होतो.स्तनशोथात , पंचांगाचा लेप द्यावा. त्वचारोगावर भुईआवळयाचे पाने मिठात वाटून लेप लावावा.
भुईआवळयाची ५ ते ६ ग्राम पाने रोज सकाळी उपाशी पोटी चावून चावून खाल्ल्याने भूक न लागण्याची समस्या दूर होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.