9 kg radish has been grown in the field of farmer Bhagwan Mundhe at Gotra in Lonar taluka.jpg 
अकोला

अबब ! शेतकऱ्याने पिकवला तब्बल 9 किलोचा मुळा

सकाळ वृत्तसेवा

लोणार (बुलडाणा) :  मुळा हा सर्वांच्याच परिचयाचा आहे. काहीजण त्याची भाजी करून खातात तर काहीजण सॅलड म्हणून त्याचा वापर करतात. मुळा म्हणलं तर डोळ्यासमोर लगेच लहान आकारचा मुळा आला असेल, बरोबर ना. पण चक्क लोणार तालुक्यातील गोत्रा येथील शेतकरी भगवान मुंढे यांच्या शेतात तब्बल 9 किलोचा मुळा पिकवला गेला आहे. हायटेक व संकरित जातीमुळे गावरान भाजीपाला तसेच फळे बियाणे नामशेष होत आहेत. संकरित जातीमुळे जास्त उत्पादनाच्या नादात फळे भाजीपाला मोठ्या आकाराचे सुधारित जाती बियाणे कंपन्या बनवतात. आज मुळा विक्रीसाठी व खाण्यासाठी काढले असता त्याचा आकार पाहून गावकरी व परिसरातील शेतकरी अबब करत मुळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. 

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील गोत्रा या गावातील भगवान मुंडे राहतात. मुंडेंनी आपल्या शेतात विविध भाज्या पिकवतात. त्यांच्या शेतात त्यांनी मुळा लावला होता. नेहमीप्रमाणं त्यांनी मुळ्याचं पीक घेतलं होतं. या शेतात इतर मुळामध्ये हा नऊ किलोचा मुळा उगवला आहे. मुळा सॅलड म्हणून भाजी आणि कोशिंबिरीमध्ये वापरले जाते. त्यांनी विक्री करण्यासाठी आणि घरी खाण्यासाठी चांगल्या प्रकारे मशागत करून भाजीपाला मुळा लागवड केली आहे. 

नऊ किलोचा मुळा शेतातून काढला त्याबाबत सांगताना मुंडे यांनी सांगितलं की, मुळा पिकाला चांगल्या पद्धतीनं खत पाणी दिलं होतं. जेव्हा मुळा काढण्याची वेळ आली तेव्हा बऱ्यापैकी शेतातील मुळा काढून झाला होता. काम सुरु असतानाच एक मुळा काढण्यासाठी मात्र थोडा वेळ लागला. सुरुवातीला मुळ्याचा आकार थोडा जास्त असेल असं वाटलं पण जेव्हा प्रत्यक्षात मुळा बाहेर काढला तेव्हा तो पाहून शेतकऱ्यांसह इतर मजूरही थक्क झाले. या मुळ्याचं वजन तब्बल 9 किलो इतकं आहे. आता लोकांमध्ये हा कौतुकाचा आणि आश्चर्याचा विषय झाला असून मुळा पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT