चार हजाराची पेटी दोन हजार रुपयांवर; हैदराबादी हापूस चारशे रुपयांना File Photo
अकोला

चार हजाराची पेटी दोन हजार रुपयांवर; हैदराबादी हापूस चारशे रुपयांना

चार हजाराची पेटी दोन हजार रुपयांवर; हैदराबादी हापूस चारशे रुपयांना

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः आंब्याचा राजा ‘हापूस’ (Hapus)आता स्वस्त झाला असून, दहा ते पंधरा दिवसांपूर्वी चार हजार रुपयांना मिळणारी देवगड किंवा रत्नागिरी हापूसची (Ratnagiri Hapus) पेटी आता दोन ते अडिच हजार रुपयांना सुद्धा मिळत आहे. हैदराबादच हापूस तर, चारशे ते पाचशे रुपये पेटी या दराने विकला जात आहे. A box of four thousand on two thousand rupees; Hyderabadi hapus for four hundred rupees

कोकणातील हापूस आंबा तसा जगभरात प्रसिद्ध आहे. अकोलेकरांनाही त्याची चांगलीच गोडी असून, दरवर्षी अकोल्याच्या बाजारात तो विक्रीसाठी येतो. मात्र, गेल्यावर्षी कोरोनामुळे इतर फळांसोबतच हापूस खरेदी-विक्रीची सुद्धा अडचण झाली होती. परंतु, या विपरीत परिस्थितीलाही अर्थार्जनाची संधी बनवित अकोल्यातील शेकडो युवकांनी साखळी व्यवसायातून घरपोच हापूस विक्री केली व कोट्यवधीचा व्यवसाय केला.

यावर्षी सुद्धा शेकडो बचत गट, संस्था व युवकांनी साखळी व्यवसायातून हापूस विक्री करण्याचा बेत आखला असून, त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये हापूस विक्रीला आला आहे. चविष्ठ, गोड, रसरशीत असणारा आकर्षक हापूस तसा सर्वांच्या आवडीचा परंतु, यावर्षी मोठ्या प्रमाणात तो विक्रीला उपलब्ध असून, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांकडूनही अपेक्षेच्या तुलनेत कमी प्रमाणात मागणी होत आहे.

सुरुवातीला चार ते साडेचार हजार रुपये पेटी या दराने विक्री होत असलेला कोकणी हापूस आता दोन, अडिच ते तीन हजार रुपये दराने विकला जात आहे.

शिवाय वातावरणात वेळोवेळी झालेल्या बदलाचाही परिणाम विक्रीला आलेल्या आंब्यावर होत आहे. त्यामुळे सुरुवातीला चार ते साडेचार हजार रुपये पेटी या दराने विक्री होत असलेला कोकणी हापूस आता दोन, अडिच ते तीन हजार रुपये दराने विकला जात आहे. हैदराबादचा, कर्नाटकी हापूस तर, केवळ ४०० ते ५०० रुपये पेटी या दराने विक्री होत आहे.

अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला

हापूस विक्रीसाठी अक्षय तृतीयाचे मुहूर्त नक्कीच लाभदायी ठरेल अशी अपेक्षा हापूस विक्रेत्यांना होती. परंतु, जिल्हाप्रशासनाने केलेला लॉकडाउन आणि कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव यामुळे हापूस विक्रेत्यांचा हिरमोड झाला असून, आणलेला हापूस कमीतकमी दरात विकून हात नुकसान टाळण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.

हापूस आंब्याच्या एका पेटीत आकारानुसार आंब्यांची संख्या ठरते. त्यानुसार एका पेटीत लहान आकाराचे सहा डझन, मध्यम आकाराचे पाच तर, मोठ्या आकाराचे चार डझन हापूस आंबे दिले जातात.

चार ते सहा डझनाचे पेटी

हापूस आंब्याच्या एका पेटीत आकारानुसार आंब्यांची संख्या ठरते. त्यानुसार एका पेटीत लहान आकाराचे सहा डझन, मध्यम आकाराचे पाच तर, मोठ्या आकाराचे चार डझन हापूस आंबे दिले जातात.

संपादन - विवेक मेतकर

A box of four thousand on two thousand rupees; Hyderabadi hapus for four hundred rupees

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News :ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT