Sudhakar khumkar sakal media
अकोला

रॅलीत कुणाच्या घरी चहापान करणे ही युती असल्याचा जावईशोध - ॲड. खुमकर

पालकमंत्र्यांना नव्हे मिटकरींना समज द्या !

सकाळ वृत्तेसवा

अकोला : कुटासा जिल्हा परिषद (kutasa jilha parishad) गटात पराभव समोर दिसल्याने आ.अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना नास्तिक असूनही देव आठवले असून त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu kadu) यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत, त्यामुळे पालकमंत्र्यांना नव्हे तर आ.मिटकरी यांनाच उपमुख्यमंत्री पवार यांनी समज देण्याची गरज असल्याचा टोला प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुधाकर खुमकर (sudhakar khumkar) यांनी लगावला आहे.

आज जिल्हा परिषदेच्या कुटासा गटासाठी मिटकरी यांनी मतदान केल्यावर माध्यमांशी बोलतांना पालकमंत्री बच्चू कडू यांनी भाजपशी युती करून आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा बालीश आरोप केला होता. त्यावर ॲड. खुमकर यांनी आज जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली. सवंग लोकप्रियता प्राप्त करण्याचा आजार मिटकरी याना जडला असून प्रसिद्धीचा कंड शमवून घेण्यासाठी मिटकरी कोणताही जावईशोध लावू शकतात याचे हा आरोप उत्तम पुरावा आहे.

कुटासा येथे प्रहार जनशक्ती पार्टी उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली सुरू असताना कुणी चहापान साठी घरी बोलावले तर भाजपशी युती कशी काय होऊ शकते ? असा सवाल करून ॲड. खुमकर म्हणाले की कुटासा गावच नव्हे तर संपूर्ण मतदार संघात मिटकरी यांच्या विरोधात वातावरण निर्माण झाले असून फाजील आत्मविश्वासाने रिंगणात उतरवलेला उमेदवार पराभूत होऊन प्रहार बाजी मारतोय हे लक्ष्यात आल्यावर त्यांनी हा कांगावा केला आहे.खंजीर वगैरे खुपसण्याची परंपरा कुणाची आहे याचे विस्मरण मिटकरींना झाले असेल तर प्रहार त्याची आठवण करून देईल असेही खुमकर म्हणाले.

मिटकरी गेट वेल सून

आ.अमोल मिटकरी जगाला व्याख्यानातून ज्ञान पाजळत असतात , मात्र त्यांनी कुटासा गावात द्वेषाच्या राजकारणाची केलेली पेरणी त्यांच्या अंगलट येणार असून आपल्या अपयशाचे खापर पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर फोडण्याचा हा अयशस्वी प्रयत्न आहे. प्रहार आणि ना.बच्चूभाऊ कडू खुले आव्हान देऊन राजकारण करणारे आहेत ,असे कुणाच्या घरी चहापान करून युती करणारे दुधखुळे राजकारणी नाहीत ,पराभवाच्या भीतीपेक्षा दादांना तोंड कसे दाखवावे या धक्क्याने मिटकरी आजारी आहेत त्यांना लवकर आराम मिळो असा टोलाही ॲड. खुमकर यांनी लगावला आहे.

पवार फडणवीस युतीची आठवण !

प्रहारची शिवसेनेशी उघड युती असल्याने आम्हाला कुणाशी छुपी युती करण्याची गरज नाही,राष्ट्रवादी आणि भाजपने युती करून पहाटे शपथविधी उरकून महाराष्ट्राची नाचक्की केली होती हे मिटकरी विसरले असतील पण महाराष्ट्र विसरला नाही असे सांगून ॲड. खुमकर म्हणाले की या कथित युतीबद्दल अजित पवारांनी बच्चू कडू याना समज देण्याची मागणी करणे हा मिटकरी यांनी केलेला सर्वात मोठा विनोद होय या शब्दात खुमकर यांनी खिल्ली उडवली .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT