Akola Buldana Marathi News Now if the bullet explodes, it will be confiscated! 
अकोला

आता बुलेटचा फटाका फुटला तर थेट जप्ती!

सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  फटाके फोडणाऱ्या बुलेटविरुद्धची मोहीम आणखी कडक करण्यात आली आहे. यापुढे गाडीच्या सायलन्सरमध्ये फटका फुटला तर थेट बुलेट जप्तीची मोहीम राबविणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी दिली.


मागील काही दिवसांपासून शहर वाहतूक शाखा अकोलातर्फे शहरातील फटाके फोडणाऱ्या बुलेटविरुद्ध धडक मोहीम राबवित आहे.

त्या अंतर्गत बुलेटच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून फटाके फोडणारे सायलेन्सर लावून बुलेट चालविणाऱ्या ‘बुलेट राजां’च्या उनाडखोरीला चाप लावला जात आहे. बुलेटविरुद्ध धडक मोहीम राबवून आतापर्यंत २५ बुलेट वाहतूक शाखेत जमा करण्यात आल्यात.

त्यांचेवर दंडात्मक कारवाई करून अशा बुलेटचे सायलेन्सर बदलून घेऊन परत मूळ सायलेन्सर लावून मगच बुलेट सोडण्यात आल्यात. या मोहिमेचा काही अंशी फरक पडला; परंतु शहरात अजूनही बरेच तरुण एक क्रेझ म्हणून अशा फटाके फोडणाऱ्या बुलेट सुसाट वेगाने चालवित असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

या तक्रारीची दखल घेऊन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे निर्देशाप्रमाणे व उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी सायलेन्सर बदलून फटाके फोडणाऱ्या बुलेट विरुद्धची मोहीम आणखी कडक केली आहे.

अशा बुलेट आढळून आल्यास त्यांचेवर सरळ जप्तीची कारवाई केली जाणार आहे. त्यांचा अहवाल प्रादेशिक परिवहन कार्यालयात पाठवून त्यांची कारवाई झाल्या नंतरच त्यांचे निर्देशानंतरच अशा बुलेट सोडण्यात येणार आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

हिंदूंची जमीन मुस्लिमांच्या नावे केल्याचे आरोप, महिला अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छापे; ९० लाखांची रोकड अन् कोट्यवधींचं सोनं जप्त

Latest Marathi News Updates : ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल!

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

SCROLL FOR NEXT