Akola Corona News Another dies due to corona; 76 new positives
Akola Corona News Another dies due to corona; 76 new positives 
अकोला

धोका कायम;  कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ७६ नवे पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  केंद्र सरकारनं  कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु केला आहे. महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यामधील कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. यवतमाळ, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणं गरजेचे झालं आहे.

अनलॉक फेज मध्ये नागरिकांनी कुठलीही काळजी न घेतल्याने आणि शाळा, हॉटेल, लग्न प्रसंग , समारंभ यातून जास्त लागण नागरिकांना झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची लस आली आहे आता कोणतीही खबरदारी घ्यावी लागणार नाही. या अविर्भावाने ही रुग्ण वाढले  असल्याने प्रशासनानसह आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.

हेही वाचा - Corona Update : पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी

कोरोना संसर्गामुळे सोमवारी (ता. १५) एका रुग्णाचा मृत्यू झाला. याव्यतिरीक्त ७६ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील मृतकांचा आकडा ३४४ झाला असून ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या ९४७ झाली आहे.

हेही वाचा - धोका वाढला; शाळा, शिकवणी २८ फेब्रुवारीपर्यंत बंद



कोरोना संसर्ग तपासणीचे सोमवारी (ता. १५) जिल्ह्यात १८३ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १०७ अहवाल निगेटिव्ह तर ७६ अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरीक्त ८१ वर्षीय एका रूग्णाचा मृत्यू सुद्धा झाला. संबंधित रुग्ण हिवरखेड ता. अकोट येथील रहिवाशी होते. त्याना ८ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सकाळी सकाळी ७६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ३२ महिला व ४४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील गोरक्षण रोड येथील पाच, चिंतामणी नगर, स्टेशन रोड, अकोट फैल व जीएससी येथील चार, डाबकी रोड, आळशी प्लॉट, जीएससी बॉय हॉस्टेल, मोठी उमरी, तापडीया नगर व जवाहर नगर येथील प्रत्येकी तीन, केशव नगर, गीता नगर, तापडीया नगर, रवी नगर, संतोष नगर व जठारपेठ येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पातूर, अकोट, पाटी, रवीनगर, कोठारी वाटीका, कपील नगर,खडकी, गायत्री नगर, राजपूत पुरा, रिध्दी सिध्दी नगर, रणपिसे नगर, शंकर नगर, जीएससी, लहान उमरी, कौलखेड, हिंगज, जठारपेठ, निंबा ता. मूर्तिजापूर, डोंगरगाव, मूर्तिजापूर, तुकाराम चौक, तेलीपुरा, सिंधी कॅम्प, राधे नगर व जूने शहर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवाशी आहे.

हेही वाचा - रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन ?


५० जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सोमवारी (ता. १५) ११, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, ओझोन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून तीन, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, अवघाते हॉस्पीटल येथून एक, सूर्यचंद्र हॉस्पीटल येथून दोन तर होम आयसोलेशन येथून २३ असे एकूण ५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

हेही वाचा - शेतकरी नेते राकेश टीकैत शनिवारी अकोल्यात, संयुक्त किसान मोर्चा फुंकणार आंदोलनाचे बिगुल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Fact Check: भाजप एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण रद्द करेल, असा दावा करणारा अमित शहांचा व्हायरल व्हिडिओ एडिटेड

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये होणार नरेंद्र मोदींची जाहीर सभा

संतापजनक! वन-वे रोडवर रिक्षा चालकाने अचानक यू-टर्न घेतला अन् तरुणाचा जीव गेला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT