Akola Marathi News- The body of a youth was floating on the water of the dam
Akola Marathi News- The body of a youth was floating on the water of the dam 
अकोला

खळबळजनक; धरणाच्या पाण्यावर तरंगत होता युवकाचा मृतदेह

सकाळ वृत्तसेेवा

बार्शीटाकळी (जि.अकोला) : तालुक्यातील महान येथील काटेपूर्णा जल प्रकल्पामध्ये रविवारी (ता. १७) सकाळी एका युवकाचा मृतदेह धरणाच्या मध्यभागी पाण्यावर तरंगताना दिसून आला. या घटनेची माहिती नागरिकांना कळताच परिसरात खळबळ उडाली.

धरणामध्ये युवकाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पिंजर पोलिस स्टेशनला देण्यात आल्याने पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांनी संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना या बाबत माहिती दिली.

हेही वाचा -अवघे गाव रडले, मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही सोडले प्राण; मकरसंक्रांतीलाच गावावर शोककळा

त्यावर दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी मयूर सळेदार, किशोर तायडे, ऋषीकेश राखोंडे रुग्णवाहिका घेवून घटनास्थळी पोहचले. यावेळी पथकातील सदस्यांनी धरणाच्या गेट जवळील पाण्यावर तरंगणारा मृतदेह ट्रेचर सिस्टमने बाहेर काढला.

हेही वाचा - ऐकावे ते नवलंच! या आज्जीबाईने वयाच्या सत्तरीतही कोरले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव

यावेळी ठाणेदार महादेव पडघान व पोलिस कर्मचारी आणि नातेवाईक हजर होते. पोलिसांनी धरणाच्या परिसरातील दुचाकीच्या नंबर वरून शोध घेत मृतकाच्या नावाची व गावाची माहिती काढली असता मृतदेह हा नागेश मधुकर पाटील ( वय ३०, रा . मोरझाडी, ता. बाळापूर) येथील असल्याले समजते.

हेही वाचा - कोरोनाला खवय्येगिरीचा तडका!, फास्टफूड सेंटर, हॉटेल, ढाब्यांवर युवकांची तुफान गर्दी

मृतकाच्या नातेवाईकांना घटनास्थळी मृतदेहाची ओळख पटविण्यास बोलाविण्यात आले होते. नातेवाईकांना सुद्धा ओळख पटल्याने सदर मृतदेह संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या रुग्णवाहिकेने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दरम्यान या प्रकरणाचा तपास पिंजर पोलिस करत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने कोलकाताला दिला दुसरा धक्का; नारायणपाठोपाठ अर्धशतक करणारा सॉल्टही परतला माघारी

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT