Akola Marathi News Fungus attacks on gram, crop burning rate is high; Ali also led the innings
Akola Marathi News Fungus attacks on gram, crop burning rate is high; Ali also led the innings 
अकोला

शेतकऱ्यांच्या हातातून आता हरभरा पिकही जाणार!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : यावर्षी हरभऱ्याचे पीक जोमदार येईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु, बुरशी लागल्याने मोठ्या प्रमाणात पीक नष्ट झाल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

वातावरणातील बदलात अळीनेही डाव साधीत बहुतांश भागात लुसलुसीत पिकावर ताव मारला. त्यामुळे हरभरा उत्पादकांना मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा -नवरा-बायकोत अंड्यावरुन झालं कडाक्याचं भांडण शेवटी अंड्यामुळे मिटलं

खरिपात मॉन्सूनचे आगमन उशिरा झाले. त्यानंतर दीर्घ खंड व पुढे सततधार पाऊस, यामुळे उडीद, मूग,ज्वारीचे पीक शेतकऱ्यांच्या हाती लागलेच नाही. सोयाबीनलाही अतिवृष्टी व अवकाळी पावसाचा मोठा फटका बसून, ६० ते ७० टक्के उत्पादन घटले.

कपाशीवर शेतकऱ्यांना भरवसा होता. परंतु, अतिवृष्टी आणि गुलाबी बोंडअळीच्या तडाख्यात या पिकातूनही शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होवू शकल्या नाहीत. जमिनीला ओल चांगली असल्याने रब्बीमध्ये हरभऱ्याच्या पिकातून तरी चांगले उत्पादन, उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.

त्यामुळे जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या ९२ टक्के भागात, म्हणजे ८२ हजार ६८८ हेक्टरवर शेतकऱ्यांनी यंदा हरभऱ्याची पेरणी केली होती. परंतु, बहुतांश भागात बुरशीमुळे हरभऱ्याचे पीक नष्ट झाल्याचे चित्र आहे.

त्यामुळे जवळपास पाच ते दहा टक्के पीक नष्ट झाले. त्यानंतर वातावरणात बदल होऊन कीड व अळीच्या प्रादूर्भाव होऊन हरभऱ्याच्या पिकाला मोठा फटका बसला. अजूनही कीड नियंत्रणासाठी शेतकरी फवारणीवर जोर देत आहेत. दोन्ही संकटांमुळे शेतकऱ्यांचे निश्‍चित नुकसान होणार असून, याचा परिणाम उत्पादन घटीवर दिसून येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -अनाथ अनुराधाचे सुख नियतिलाही पहावले नाही!

पेरले दाट उगवले विरळ
एरव्ही हरभऱ्याची पेरणी करताना एकरी तीस किलो बियाणे शेतकरी टाकत असतात. यंदा मात्र ३५ ते ४० किलो एकरी बियाण्याची पेरणी केली. परंतु, बियाण्याची गुणवत्ता कमी भरल्याने व ओल तुटल्याने बहुतांश भागात विरळ पीक उगवले. त्यामुळे सुरुवातीलाच शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT