अकोला : अयोध्या येथे बांधण्यात येत असलेल्या राम मंदिरासाठी अकोलेकरांनी नऊ चांदीच्या विटा दान दिल्या आहेत. या विटा श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने श्री राम जन्मभूमी न्यास कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज यांच्याकडे सोपविण्यात आल्यात.
हेही वाचा - गोळीबाराने हादरले शहर; वाढदिवसाच्या दिवशीच घटला थरार, गोड्या झाडून लुटली रक्कम नागपूर येथील महाराणा प्रताप चौक येथे आयोजित कार्यक्रमात या विटा सोपविण्यात आल्यात. कार्यक्रमाचे अध्यक्ष रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवा अधिकारी आमदार गोवर्धन शर्मा होते. प्रमुख अतिथी म्हणून विलास अनासने, ब्रिजमोहन चितलांगे, विजय कछवाह, विजय वर्णेकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी यांनी केले तर प्रास्ताविक अनिल मानधने यांनी केले. आभार गिरीराज तिवारी यांनी मानले. यावेळी नितीन जोशी, राम ठाकूर, अजय पांडे, शैलेश राठोड, प्रवीण मानकर, प्रमोद जावरकर, मोहन गुप्ता, शंकर खोवाल आदींसह रामभक्त्यांची उपस्थिती होती. हेही वाचा - हे तर नवलंच! सातपुड्यातील ‘तेल्यादेवाला’ लागते तंबाखू, बिडी आणि सिगारेटही, जाणून घ्या रंजक कहाणी हेही वाचा - गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार (संपादन - विवेक मेतकर) | |||
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.