Akola Marathi News An orphan girl from Guddhi died due to electric shock 
अकोला

आली लग्न घटीका, पण अनाथ अनुराधाचे सुख नियतिलाही पहावले नाही!

सकाळ वृत्तसेेवा

अकाेला : गुडधी येथील अनाथाश्रमात लहानाची माेठी झालेल्या अनुराधाचा विवाह ३१ जानेवारी राेजी ठरला.  पती मिळाला, कुटुंबही मिळाले.

अनाथ असल्याचे दु:ख आता दूर हाेईल या आनंदात असतानाच तिचे सुख नियतीलाही पाहवले नसल्याचे १९ जानेवारी सायंकाळी घडलेल्या घटनेवरून समाेर आले.

अगदी लहान असतानाच अनुराधा वानखडे हिला गुडधी येथील अनाथाश्रमामध्ये ठेवण्यात आले हाेते. येथेच ती लहानाची माेठी झाली. आयुष्यात अनाथ असल्याचे प्रचंड दु:ख कायमचेच. मात्र,  ती १८ वर्षाची हाेताच तिला जुने शहरातील शिवसेना वसाहत येथील रहिवासी शिवा वानरे यांनी लग्नाची मागणी घातली.

अनुराधालाही प्रचंड आनंद झाला. आयुष्यातील दु:खाची रात्र ३१ जानेवारी राेजी संपणार होती. विवाह बंधनात अडकण्याच्या आनंदात असतानाच अनुराधाला अनाथाश्रमामध्ये मंगळवारी सायंकाळी वरच्या माळ्यावर अचानक विजेचा धक्का लागला.

यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अनुराधाला तातडीने सर्वाेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारही सुरू झाले मात्र काही वेळातच अनुराधाचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती शिवा वानरे यांच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनीही तातडीने रुग्णालयात धाव घेतली. अनुराधाचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांच्यावर दु:खाचा डाेंगर काेसळला.

एका अनाथ मुलीशी विवाह करून एक वेगळी प्रेरणा देण्याचा प्रयत्न शिवाने केला हाेता. मात्र दाेघांचेही सुख नियतीला पाहवले नाही आणि एका अपघातात अनुराधाचा मृत्यू हाेताच एका संसारवेलीचा सुरुवात हाेण्यापूर्वीच घात झाला.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT