मूर्तिजापूर (जि.अकोला) : दर्यापूर रस्त्यावरील सिरसो फाट्याजवळ बुधवारी सकाळी ९.३० च्या दरम्यान एका मोटारसायकलला अज्ञात वाहनाने कावा मारल्याने मोटारसायकल चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार रस्त्याच्याकडेला असलेल्या खड्ड्यात पाडल्याने गंभीर जखमी झाला.
मूर्तिजापूर - दर्यापूर रस्त्याचे नुतनीकरण व रुंदी करण झाल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे व अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रामकृष्ण बागराज पवार (५०, रा. खैरी, आसेगाव पूर्णा) हे आपल्या मुलीच्या पत्रिका वाटून गावाकडे मोटारसायकल ( क्रमांक एमएच २७ बीसी ८६३४) ने गावी परत जात असताना सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान सिरसो फाट्यावर अज्ञात वाहनाने कावा मारल्याने त्यांचे नियंत्रण सुटताच ते रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात दगडावर आदळल्याने गंभीर जखमी झाले.
हेही वाचा - ‘आमच्या हातात गुजरात द्या, आम्ही अहमदाबाद चे नाव बदलवून दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो’
त्यांना तातडीने उपचारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)
| |||
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.