Akola Marathi News Two young women carry Gajanan Maharajs palanquin on their shoulders till Shegaon! 
अकोला

दोन तरुणींनी श्रींची पालखी नेली शेगावपर्यंत खांद्यावर!

सकाळ वृत्तसेेवा

अकोट (जि.अकोला) : श्री गजानन महाराजांच्या भक्तांमध्ये आबालवृद्धांचा समावेश आहे. यात तरुणीही मागे नाहीत. पायदळ वारी असो की, गुरुवारची वारी मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. अशाच एका वारीत अकोट तालुक्यातील वरुर जऊळका येथून थेट शेगावपर्यंत श्रींची पालखी आपल्या खांद्यावर नेणाऱ्या दोन तरूणी सध्या भाविकांच्या कौतुकाचा विषय ठरल्या आहेत.


वरूर जऊळका येथील योग योगेश्वर संस्थानच्या माध्यमातून महा क्षेत्र शेगाव येथे पायदळ दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. या दिंडी सोहळ्याला परिसरातून वर्षानुवर्ष भरपूर प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी शासनाच्या नियम अटीचे पालन करून दिंडी सोहळ्याचे प्रस्थान ता.१३ फेब्रुवारी झाले. परिसरातील भाविक या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते.

यावर्षी दिंडी सोहळ्यात वेगळेपण दिसून आले. वरुर जऊळका येथील कु. वैष्णवी बुरघाटे व कु. पूजा बुरघाटे या दोन तरुणींमुळे. श्रींची ५० किलोची पालखी योग योगेश्वर संस्थान वरूर जऊळका येथून श्रीक्षेत्र शेगावपर्यंत तब्बल साठ किलोमीटर अंतर आपल्या खांद्यावर पालखी घेवून या तरुणींना पार केले. तब्बल ६० किलोमीटर अंतर पालखी खांद्यावर घेवून पार करणाऱ्या या भाविक तरुणींचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. शेगाव येथे गणेश महाराज शेटे यांच्या काल्याच्या कीर्तनाने दिंडीचा समारोप करण्यात आला. यावेळी भानुदास बुरघाटे, सुभाष बुरघाटे, बबनराव खरड, बबन सपकाळ, प्रदीप पाटील बुरघाटे, अरुण पाटील बुरघाटे, राजेश बुरघाटे या वारकरी मंडळींचे मोलाचे सहकार्य मिळाले. 

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune LPG Shortage : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! एलपीजी सिलिंडर घरपोच मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नागरिकांच्या रांगा झाल्या कमी

माजी सरन्यायाधीश राज्यसभेतून निवृत्त, ६ वर्षात एकही प्रश्न विचारला नाही, चर्चेत एकदाच सहभाग त्यातही वादग्रस्त विधान

Air India Flight Emergency: न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान हवेतच बंद, सहा तास आकाशात राहिल्यानंतर ... मोठी दुर्घटना टळली!

Sambhajinagar News: बारवेलगत अतिक्रमणाचा डाव उधळला; महापालिकेची कारवाई; समर्थनगरमध्ये पत्र्याचे शेड हटविले

Sambhajinagar Hospital News: घाटीवरील ताण कमी होणार; १८९ कोटींचे माता-बाल रुग्णालय लवकरच सुरू; दूध डेअरी परिसरात अत्याधुनिक महिला रुग्णालय

SCROLL FOR NEXT