Akola News: Awaiting update on dilapidated documents in Zilla Parishad schools 
अकोला

जीर्ण दस्तावेजात शोधावा लागतो भवितव्याचा आधार

विरेंद्रसिंह राजपूत

नांदुरा (जि.बुलडाणा) :  जिल्हा परिषद शाळेत असणारे जुने दस्तावेज जीर्ण झाली आहेत. कुठे-कुठे या जुन्या दस्तावेजाना वाळवी लागली आहे. ही दस्तवेज आतापर्यंत अपडेट झालीच नसल्याचे भवितव्याचा आधार शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यासाठी हे सर्व जुने दस्तावेज आधुनिक काळात अपडेट करण्याची गरज निर्माण झाली आहे.


देश स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ग्रामीण भागात जिल्हा परिषदमार्फत शिक्षणाची दालने निर्माण करण्यात आली आहे . या शाळांनी अनेक विद्यार्थ्यांच्या पिढ्या अनुभवल्या आहेत. शाळा त्याच आहेत; परंतु प्रारुपमध्ये बदल करण्यात आले आहेत.

या शाळेत अनेक पिढ्यांचे दाखल रजिस्टरमध्ये जन्म-तारखांच्या नोंदीसह कागदपत्रे उपलब्ध आहेत. गेल्या ५० वर्षापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे यापैकी आज घडीला बहुतांश विद्यार्थी हयात नाहीत. परंतु त्यांच्या पाल्यांना आवश्यक दस्तऐवज तयार करताना वडिलोपार्जित नोंद असणाऱ्या रेकॉर्डची गरज पडत असल्याने त्यांना गावातील शाळेत धाव घ्यावी लागत आहेत.

जिल्हा परिषद शाळेत असणारे जुने रेकार्ड जीर्ण झाले असून, वारंवार रजिस्टरची उलथापालथ करण्यात येत असल्याने रेकॉर्डची अवस्था वाईट झाली आहे. महत्त्वाचे रेकॉर्ड असल्याने मुख्याध्यापक त्यांचे जतन करण्याचे प्रयत्न करीत आहे .परंतु त्यांच्या या प्रयत्नांना बहुतांशरित्या यश येत नसल्याने कापडात गुंडाळून ठेवलेले हे रेकॉर्ड वाळवीने फस्त केली आहे.

कुठे रजिस्टरमधील पाने गायब झाली आहे. जातीचे प्रमाणपत्र तयार करताना पाल्यांना याच नोंदीची आवश्यकता आहे. आज घडीला हा रेकॉर्ड दिसत असला तरी येत्या १० वर्षानंतर जीर्ण रजिस्टर दिसणार नाही. बहुतांश शाळेमध्ये जुने जीर्ण रेकार्ड जतन करण्यात आले नाही. यामुळे त्याचेकडून रेकॉर्ड नसल्याचे शेरा देण्यात येत आहे. यामुळे पाल्यांना वडीलाचे रेकॉर्डकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घ्यावी लागत असून, मनस्ताप सहन करावा लागत आहे. वास्तविक ग्रामपंचायतमधील रेकॉर्ड अपटेड करण्यात येत असून, अन्य विभाग रेकॉर्ड अपडेट करीत आहेत.


शाळा संगणकीकृत, मात्र अपडेटकडे कानाडोळा
बहुतांश जिल्हा परिषद शाळा डिजिटल झालेल्या आहेत. या शाळेकडे संगणक आहेत. परंतु जुना रेकॉर्ड अपडेट करण्यात आला नाही. यामुळे रेकॉर्डकरिता धांदल उडत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT