Akola News: Maize and sorghum procurement stalled due to indifferent policy of the government
Akola News: Maize and sorghum procurement stalled due to indifferent policy of the government 
अकोला

शासनाचे उदासीन धोरणामुळे मका, ज्वारी खरेदी रखडली

सकाळ वृत्तसेेवा

तेल्हारा (जि.अकोला) : अकोला जिल्ह्यात मक्का, ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन तेल्हारा तालुक्यात होते. मात्र अद्यापही शासनाने खरेदी केंद्र सुरू न केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याकडे लोकप्रतिनिधींनीही पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.


यावर्षी शासनाने आधार भूत किंमत योजने अंतर्गत खरेदी करण्यासाठी कोणत्याही संस्थेला आदेश न दिल्याने तेल्हारा तालुक्यात मक्का व ज्वारी खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

मागिल वर्षी खरेदी विक्री संघातर्फे करण्यात आलेल्या हरबरा, मका खरेदीमध्ये अनियमता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे शासनाने यावर्षी खरेदी विक्री संस्थेला खरेदी करण्यासाठी आदेश दिले नाही.

त्यामुळे ज्वारी, मका उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. नोंदणीसाठी अवघे चार दिवस शिल्लक असतानाही खरेदी करण्यासाठी संस्थेला आदेश न दिल्याने शेतकऱ्यांनी कुणाकडे बघावे अशी स्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी पिकाने दगा दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरबरा व तुरीसोबतच मका आणि ज्वारीची पेरणी केली होती. शासनाने खरेदी चालू न केल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

हेही वाचा -  अकोला, वाशीम जिल्ह्यात बसविणार ‘डमी वॉर टँक

पालकमंत्री लक्ष देतील का?
तेल्हारा तालुक्यात मका, ज्वारी खरेदी चालू करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी तातडीने खरेदी सुरू करण्यासंदर्भात अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. पालकमंत्री कमा व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

शासनाने तेल्हारा तालुक्यात मका, ज्वारी खरेदी करण्यासाठी पात्र संस्थेला खरेदीचे आदेश तातडीने देवून, शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे.
- पुंडलीक अरबट, माजी अध्यक्ष, खरेदी विक्री संस्था, तेल्हारा.

आधारभूत किंमत योजने अंतर्गत खरेदी करण्यासाठी काही संस्थांनी डीएमओ ऑफिसकडे अर्ज केले व सदर अर्ज वरिष्ठांना पाठविण्यात आले आहे.
- एच. डब्ल्यू. हजारे, प्रभारी डीएमओ, अकोला
(संपादन - विवेक मेतकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT