Akola News: No separate permission required for marriage now! 
अकोला

आता विवाहासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही!

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  :  कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शासनाने ता. २२ जून रोजी लग्न समारंभ आयोजनाकरिता नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार लग्न समारंभ व तत्सम कार्यक्रमांसाठी आयोजकांना परवानगी घ्यावी लागत होती.

परंतु आता लग्न व तत्सम कार्यक्रमांसाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे परिपत्रक अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (महसूल) डॉ. नीलेश अपार यांनी जारी केले आहेत. त्यामुळे नागरिकांची आता लग्न परवानगीसाठी शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवण्यापासून सुटका झाली आहे.


मिशन बिगीन अगेन अंतर्गत ५० लोकांना (व्यक्ती) लग्न समारंभ व तत्सम कार्यक्रमांसाठी राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आलेली आहे. लग्नासाठी उपस्थित असलेल्या ५० व्यक्तींमध्ये बॅंड पथक व संगीत कार्यक्रम करणाऱ्या सदस्यांचा समावेश आहे.

कार्यक्रमस्थळी कोविड १९ चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सामाजिक अंतर व इतर आवश्यक उपाययोजनांचा अवलंब करण्यात यावा, असे आदेश शासनाकडून जारी करण्यात आले आहेत.

परंतु त्यानंतर सुद्धा सदर नियमांचे पालन होत नसल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग अधिनियम १८९७ अन्वये व भारतीय दंडसंहिता १८६०च्या कलम १८८ अन्वये शिक्षेसाठी पात्र असलेला गुन्हा केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेश उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनी दिले आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : मयूर रथातून दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक; रंगीबेरंगी फुलांनी सजला रथ; सकाळी ८ वाजता मुख्य मंदिरातून मिरवणुकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT