Akola Political News Akot Taluka Gram Panchayat Election Reservation Sarpanch Candidate
Akola Political News Akot Taluka Gram Panchayat Election Reservation Sarpanch Candidate 
अकोला

आरक्षण निघाले; उमेदवारच नाही! आता काय करणार?

सकाळ वृत्तसेवा

अकोट (जि.अकोला) : तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सरपंचपदाच्या सोडतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून होते. आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर काही गावांमध्ये सदस्यपदासाठी आरक्षित प्रवर्गाचा सदस्य नसल्याने पेच निर्माण झाला आहे. आता यामधून प्रशासन कशा प्रकारे तोडगा काढते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहणार आहे.


तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण ता. १ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आले. यात अकोट तालुक्यातील ग्राम सावरा आणि ग्राम वडाळी सटवाई दोन्ही अनुसूचित जमातीसाठी आरक्षण निघाले. मात्र, या ग्रामपंचायतमध्ये संबंधित प्रवर्गाचा उमेदवार निवडून आला नसल्याने गावात सरपंचपद रिक्त राहणार आहे.

त्यामुळे सध्याचे अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण रद्द करण्याची मागणी सावरा येथील ग्रामस्थ वैभव गुजरकर यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

हेही वाचा - मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड केले अन बॅंक खात्यातून 35 हजार उडाले

तालुक्यातील ग्राम सावरा येथील सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिलेसाठी जाहीर झाले. मात्र, या प्रवर्गासाठी प्रभाग आरक्षणात एकही जागा नव्हती. त्यामुळे विजयी उमेदवार या प्रवर्गातील एकही महिला सदस्य नाही. त्यामुळे अनुसूचित जमाती स्‍त्री प्रवर्ग प्रवर्गातील उमेदवार नसल्याने आता सरपंचपद रिक्त राहणार आहे. उपसरपंच पदाची निवड ही सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली बोलावलेल्या विशेष बैठकीत केली जाते. त्यामुळे आता उपसरपंच निवड कशी होईल याबाबतही ग्राम सावरा येथील ग्रामस्थांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा - बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या वडिलांना लेकींचा अखेरचा निरोप

आरक्षणाची सोडत निवडणुकीनंतर काढल्याने गोंधळ
सरपंच आरक्षण सोडत निवडणुकीपूर्वीच झाली असती तर हा गोंधळ झाला नसता.स्थनीक ग्रामस्थ म्हणतात, निवडणुकीआधी सोडत निघाली असती तर आम्ही नियमानुसार योग्य त्या जागेवर अनुसूचित जाती स्त्री उमेदवार निवडून आणला असता. निवडणुकीनंतर आरक्षण सोडत घेतल्याचा हा परिणाम आहे अशी प्रतिक्रिया वैभव गुजरकर यांनी व्यक्त केली. यामुळे जे सरपंच पदासाठी इच्छुक होते, त्यांची देखील निराशा झाली.

हेही वाचा - 

लोकसंख्या असतानाही प्रभाग आरक्षित का नाही?
शासनाने केलेल्या २०११ च्या जणगणनेमध्ये या गावात या प्रवर्गाची लोकसंख्या असताना, प्रभाग रचना करतेवेळी लोकसंख्येचा विचार का केला नाही असा सवाल यानिमित्त विचारला जात आहे.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT