Akola Political News Matrutirtha Sindkhed Raja Development Plan Buldana Chief Minister Uddhav Thackeray, Development Works
Akola Political News Matrutirtha Sindkhed Raja Development Plan Buldana Chief Minister Uddhav Thackeray, Development Works 
अकोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब मातृतीर्थकडे लक्ष देणार काय?

गजानन काळुसे

सिंदखेड राजा (जि.बुलडाणा) :  राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेले मातृतिर्थ सिंदखेड राजा शहराचा विकास होण्यासाठी शासनाकडून सिंदखेड राजा विकास आराखडा चे नियोजन करण्यात आले होते.त्यानुसार 2015 मध्ये  तत्कालीन शासनाने सिंदखेड राजा विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली,

त्यानुसार स्थानीक नगर परिषदेच्या माध्यमातून 17 मे 2016 रोजी जिल्हा नियोजन समिती कडे विविध विकास कामांसाठी 76.32 कोटी चा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यामध्ये सिंदखेड राजा शहरासाठी पाणी पुरवठा वितरण व्यवस्था , भुयारी गटार योजना , मोती तलावांचे सुशोभीकरण ,चांदणी तलावांचे सुशोभीकरण, जिजाऊ विकास आराखडा अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कामे या प्रमुख कामाचा समावेश होता. परंतू अनेक वर्षे उलटून स्थानिक नगर पालिकेच्या माध्यमातून कोणत्याही कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे सिंदखेड राजा विकास आराखड्याचे काम हे फक्त लाल फिती मध्ये अडकल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळे नगर पालिका व प्रशासन करते तरी काय ? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.

मातृतीर्थ सिंदखेड राजा शहराचा विकास होण्यासाठी व पर्यटनाला चालना देण्यासाठी विकास कामे व ऐतिहासिक गोष्टींचे जतन व संवर्धन करण्यासाठी शासनाने विकास आराखड्याचे नियोजन केले होते.

पाणीपुरवठा
नगरपालिकेच्या माध्यमातून सिंदखेड राजा  शहरातील नागरीकांना पाणीपुरवठा व्यवस्थित मिळण्यासाठी अंदाजे किंमत 14.42 कोटी चा प्रस्ताव तयार करण्यात आला होता त्याची तांत्रिक मान्यता होऊन सुद्धा शासनाकडे सादर करण्यात आला परंतु शासनाच्या नगर विकास विभागाकडू अद्यापही प्रस्तावाला मान्यता मिळालेली नाही.

भुयारी गटार योजना
भुयारी गटार योजना अंदाजे किंमत 36.64 कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुख्य अभियंता यांच्याकडे तांत्रिक मान्यता साठी सादर करण्यात आलेला आहे. प्रस्तावात त्रुटी असल्यामुळे प्रस्ताव प्रलंबित आहे.

मोती तलाव
मोती तलाव जलसंवर्धन व  सुशोभिकरण करण्यासाठी अंदाजे किंमत 10.64 कोटी प्रस्ताव जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे सादर करण्यात आला होता, परंतु या प्रस्तावामध्ये काही त्रुटी असल्यामुळे सदरचा प्रस्ताव हा परत आला होता त्यानंतर नगरपालिकेने संबंधित एजन्सीला पत्र देऊन त्रुटी पूर्ण करण्याचे सांगितले असल्याची माहिती आहे. मोती तलावाचे मालकी हक्क हे सहाय्यक संचालक पुरातत्व विभागाकडे असल्यामुळे त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळावे पाठपुरावा करत असल्याची माहिती आहे.

चांदणी तलाव
चांदणी तलाव जलसंवर्धन व सुशोभिकरण करण्यासाठी अंदाजे किंमत 10.21 कोटी रुपयाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. परंतु चांदणी तलावाचे मालकी हक्क भारतीय पुरातत्व संरक्षण विभाग नागपुर यांच्याकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी करण्यात आलेली आहे परंतु ते सुद्धा मिळाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे स्थानिक नगरपालिकेत प्रशासन करते तरी काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिजाऊ विकास आराखडा अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते त्यापैकी 2 कोटी रुपये नगर पालिकेला सन 2019 मध्ये प्राप्त झाले होते. 1 कोटी रुपयेच्या माध्यमातून नगर पालिकेने उद्यान विकसित करण्याचे ठरवले आहे त्यासाठी 1 कोटी रुपये खर्च होणार आहे. तर 1 कोटी रुपयांमध्ये पाणी पुरवठा साठी जलकुंभांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी दिली आहे. 
 

सिंदखेड राजा विकास आराखडाला 2014 मध्ये मंजुरात मिळाली होती, तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ व आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन समिती कडे विकास आराखडा तयार करून सादर करण्याचे सांगितले होते.त्यानुसार त्यावेळी विकास आराखड्यासाठी 318 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता.त्यामुळे सिंदखेड राजा विकास आराखडातील कामांना गती देवून चालना देण्याची गरज आहे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोणार विकास आराखड्यासाठी येत आहे.त्यांचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी मातृतिर्थ सिंदखेड राजा मध्ये येऊन पहाणी करावी. व विकास आराखड्यातील कामांना गती द्यावी व मुख्यमंत्र्यांनी दर 3 महिन्याला सिंदखेड राजा विकास आराखड्याच्या संदर्भामधील विकास कामांचा आढावा घ्यावा.
- ॲड. नाझेर काझी , माजी नगर अध्यक्ष सिंदखेड राजा तथा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा

 निधी अभावी कामे रखडली
सिंदखेड राजा विकास आराखड्यातील लखुजीराव जाधव राजवाडा, सावकार वाडा , रंग महाल निळकंठेश्वर मंदिरकाळा कोट या ठिकाणी 4 कोटी ते 5 कोटी रुपयांची कामे झालेली आहे.परंतु संबधित ठेकेदारांना 1.30 कोटी रुपये दिलेली आहे. त्यामुळे निधी उपलब्ध नसल्यामुळे ठेकेदारांने कामे सुरू केलेली नाही.त्यांच प्रमाणे सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक वास्तू मध्ये 3 ते 4 कोटी रुपयांचे कामांसाठी लागणारे साहित्य पडुन आहे. शासनाकडून निधी उपलब्ध नसल्यामुळे ऐतिहासिक वास्तूच्या कामे रखडली आहे.अशी माहिती नागपूर पुरातत्व विभागाचे अधिकारी जया वाहणे यांनी दिली आहे.

सिंदखेडराजा विकास आराखड्या अंतर्गत नगर परिषदेला 3 कामे देण्यात आली आहेत.त्यातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्था प्रशासकीय मान्यता करिता सादर करण्यात आले असून इतर प्रस्ताव तांत्रिक मान्यतेनंतर शासनाला सादर करण्यात येतील.
- प्रशांत व्हटकर, मुख्याधिकारी नगर परिषद सिंदखेड राजा 

(संपादन - विवेक मेतकर)

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT