temperature.jpg
temperature.jpg 
अकोला

अरे हे काय! कुल जिल्हा कोरोनासोबत आता याचाही बनतोय ‘हॉटस्पॉट’

सकाळ वृत्तसेवा

चांडोळ (जि.बुलडाणा) : इंग्रज काळापासून कुल सिटी म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा शहराला आता हॉटस्पॉट म्हणून संबोधले जात आहे. साधारण मे महिन्यात 38 ते 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहणारे तापमान वर्षांनुवर्ष वाढत असून, यंदा संपूर्ण मे महिन्यात पाऱ्याने 42 ते 44 सेल्सिअसपर्यंत पारा गाठला आहे. 

साधारणत: मे महिन्याच्या 25 तारखेपासून वातावरणात बदल घडून येत असल्याचे बोलल्या जाते परंतु, यंदा 30 मे पर्यंतही उष्णतेच्या असह्य झळांनी अंगाची लाही - लाही करून सोडले असून तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. सूर्याने नागरिकांना घामाघूम करून सोडले आहे. नागरिकांना उकाड्याचा असह्य त्रास सोसावा लागत आहे. चांडोळ येथे तापमानाने 42 अंश सेल्सिअस पेक्षाही जास्त सीमा ओलांडलेली दिसून आली.

थंड हवेचे ठिकाण म्हणून बुलडाणा जिल्ह्याची ओळख निर्माण झालेली आहेत परंतु उष्णतेच्या असह्य वेदनेने थंडगार बुलडाणा जिल्ह्याला त्रस्त करून सोडले आहे. सूर्य जणू आग ओकत असल्याची चाहूल लागली आहे. तापमानाने रौद्ररूप धारण केल्याने नागरिक कमालीचे घामाघूम झाले आहे.उष्णतेच्या लाटेत संपूर्ण महाराष्ट्र होरपळून गेला आहे. मे महिन्यात अवकाळी पावसाच्या थंडगार शिडकाव्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण केला होता.

परंतु नंतर तापमानात झपाट्याने वाढ होऊन रौद्ररूप धारण करून जनतेस त्रस्त करून सोडले आहे. उन्हाच्या दाहकतेने ग्रामीण भागासहित शहरी भागातील रस्ते निर्मनुष्य झाले आहे. उन्हामुळे सर्वत्र शुकशुकाट पसरलेला दिसून येत आहे. असह्य उष्णतेच्या झळांमूळे शेतीच्या मशागतीवर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे. टाळेबंदीच्या काळात उष्णतेने त्रस्त करून सोडले आहे.उन्हाच्या तीव्रतेने लहान चिमुकल्यांना आणि वयस्कर मंडळींना कमालीचा त्रास सोसावा लागत आहे. 

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी शक्यतोवर घराबाहेर जाने टाळावे व उन्हाच्या झळांपासून स्वतःचा बचाव करावा असा सल्ला तज्ञ डॉ.देत आहे. जर घराबाहेर काही अत्यावश्यक कामासाठी बाहेर निघाल्यास डोक्यावर टोपी, रुमाल किंवा ऊन लागणार नाही म्हणून खबरदारी घ्यावी. उन्हाळ्यात सुती कॉटनचे सैल कपडे वापरावे, डोळ्यांवर गॉगल लावावा अशी खबरदारी घेऊनच घराबाहेर पडावे. जेणे करून उन्हाच्या तीव्रतेपासून आपले संरक्षण होईल.

रस्ते झाले निर्मनुष्य
टाळेबंदी त्यात सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवायला लागली असून रस्त्यांवर पूर्णतः शुकशुकाट पसरलेला दिसून येत आहे.शेतकरी सकाळी 11 वाजे पूर्वीच शेतीच्या मशागतीची कामे करून नंतरचा वेळ घरातच घालवत आहे. लखलखत्या उन्हात शेतीची मशागत पूर्वीची कामे करणे हा शेतकऱ्यांसमोर फार मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यात पशुधनाला भर उन्हात चारा पाणी करणे याबाबी शेतकऱ्यांसाठी तारेवरची कसरत ठरत आहे. भर उन्हात बळीराजाला आपला घाम गाळावा लागत आहे.

पशुधन सावलीच्या शोधात
उन्हाच्या चटक्याने पशुधनाच्या अंगांची सुद्धा लाही - लाही होत आहे. त्यामुळे शेतातील गडद झाडाच्या सावलीत किंवा गोठ्यात जनावरे आसरा घेताना दिसून येत आहे. शेतकरी जास्त उन्हामुळे ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत करताना दिसत आहे.

घरगुती थंड पेयाचा वापर वाढला
उष्णतेपासून दिलासा मिळावा म्हणून नागरिक शीतपेयांची व रसवंतीच्या दुकानावर न जाता घरगुती थंड पेयचा जास्त प्रमाणात वापर करताना दिसत आहे. त्यात दही, लस्सी, ताक घेऊन नागरिक तहान भागवत आहे.

42 त 44 सेल्सिअस तापमान
यंदा मे महिन्यात पार्‍याने 42 ते 44 डिग्री सेल्सिअस पर्यंतचा टप्पा गाठला होता. केवळ 14 व 15 मे तापमानामध्ये कमालीची घसरण पहावयास मिळाली. परंतु, नंतर तो चढतीवरच राहिला आहे. एकीकडे कोरोनाचा प्रभाव असल्यामुळे घरात राहणे तर दुसरीकडे उकड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना वरुण राजा कधी दिलासा देतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT