tehsildar
tehsildar sakal
अकोला

शेतकरी कुटूंबातील इंद्रायणीची तहसीलदार पदाला गवसणी

सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर : तालुक्यातील तामगाव येथील एका शेतकरी कुटूंबातील (farming family) कन्या व सोनाळा येथील सून असलेली इंद्रायणी गोमासे (Indrayani Gomase) ( इंगळे ) हिने एमपीएससी परिक्षेत यश मिळवित तहसीलदार पदाला (Tehsildar Post)गवसणी घातली आहे. १७ जानेवारी रोजी ती गोंदिया येथे तहसीलदार म्हणून रुजू झाली आहे.

शेतकरी कुटुंबात जन्मलेली आणि वेगळं काही तरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील तामगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांची कन्या इंद्रायणी गोमासे हिचा विवाह सोनाळा येथील इंगळे परिवारात झाला. सासरच्या लोकांनी सुद्धा तिचे शिक्षणाला विरोध न करता शिक्षण सुरू ठेवले व ती राज्यसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन तहसीलदार झाली. तिला शासनाकडून तहसीलदारपदी रुजू होण्याचे आदेश आल्यावरून गोंदिया तहसील कार्यालयात सोमवारी परिविक्षाधीन तहसीलदार म्हणून तिची नियुक्‍ती झाली आहे. इंद्रायणीचे माहेरचे आडनावं गोमासे असून वडील मुरलीधर गोमासे तामगाव येथील अल्पभूधारक शेतकरी आहे. इंद्रायणी हिेने तिच्‍या अभ्यासात सात्‍यत व चिकाटी ठेवत तसेच प्रतिकुल परिस्‍थितीवर मात करीत हे यश मिळविले आहे.

बीएससी प्रथम वर्षांला असतांना इंद्रायणीचा विवाह सोनाळ्याच्‍या इंगळे परिवारातील केंद्रीय पोलीस दलातील जवान विजय इंगळे यांच्या सोबत झाला. पण लग्न झाल्यावरही इंद्रायणी यांनी शिक्षण पूर्ण करून यशाचं शिखर गाठलं. वडिलांकडे फक्त तीन एकर जमीन. त्यात तीन बहिणी आणि एका भावाच्या शिक्षणाचं ओझं , मात्र इंद्रायणी यांच्या वडिलांनी मुलींचं शिक्षण थांबवलं नाही. शेती पिकवून त्यांनी मुलींचं शिक्षण व लग्न केले. इंद्रायणी यांचे पती सीआरपीएफमध्ये असून देशाची सेवा करत आहेत. बाकी परिवार शेतकरी असल्यावरही , सासरच्यांनी त्यांचा शिक्षणाला विरोध न करता शिक्षण सुरूच ठेवलं. याच फलित म्हणजे इंद्रायणी यांनी कृषी पदविकेत १० पुरस्कार पटकावले.यात ५ सूवर्ण , २ रजत तर ३ रोख पुरस्कार आहेत. सातपुड्याच्या पायथ्याशी ग्रामीण भागातील एक कन्या असलेल्या इंद्रायणीने यश मिळवल्याने तिचे संग्रामपूर तालुक्यासह जिल्हाभरात अभिनंदन व कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : पुण्यात काही ठिकाणी बोगस मतदान तर अनेकांची नावं मतदार याद्यांमधून गायब? 'या' दिग्गजांचा समावेश

Baramati Loksabha election : ''बारामतीमधील स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही 45 मिनिटं का बंद होते?'' निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

Lok Sabha Poll : खुलताबाद शहरातील काही केंद्रातील EVM बंद; मतदार वैतागले,महिलांचा त्रागा

Savaniee Ravindrra: 'मत न देताच परत यावे लागले' सावनी रवींद्रचा संताप, मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांना भेटूनही...

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: पुण्यात ठिकठिकाणी बोगस मतदान, नागरिकांना यादीत मिळेना नाव; मुंढव्यात ईव्हीएम बंद

SCROLL FOR NEXT