अकोला

आई रुक्मिणी माता विदर्भातील इतर दिंड्यांना पदरात घेतील का?

सकाळ वृत्तसेवा

अकोट : कौंडण्यपूर विठ्ठल रुक्मिणी विश्वस्त मंडळी, पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि प्रशासनाने सर्वांच्या समन्वयातून आणि वारकरी संघटनांना विश्वासात घेऊन जर आई रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्या सोबत इतरही दिंड्यांना स्थान प्राप्त करून दिले तर विदर्भामध्ये आई रुक्मिणी मातेने सर्व संतांना पदरात घेऊन आपल्या सोबत आषाढी वारीला पंढरपूरला नेऊन सर्व संतांची वारी घडवून आणल्यामुळे हा एक ऐतिहासिक सोहळा होऊ शकतो. (Kaudanyapur Dindi can go to Pandharpur Wari)


आषाढी वारी निमित्त महाराष्ट्रातून मानाच्या फक्त दहा पालख्या वाहनाने जाणार आहेत आणि त्यामध्ये विदर्भातील आई रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्याचा समावेश आहे. पण विदर्भामधून इतरही काही दिंड्या शेकडो वर्षाची पायी जाण्याची परंपरा जोपासत आहेत. म्हणून इतरही दिंड्यांना वाहनाने का होईना पण आषाढी वारीमध्ये सहभागी होता यावे याकरिता विश्व वारकरी सेनेने पालकमंत्री यशोमती ठाकूर व माननीय नाना पटोले यांना विनंती करून प्रशासकीय बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यात आई रुक्मिणी माता कौंडण्यपूर संस्थान यांच्या पालखी सोहळ्या सोबत इतर प्रत्येक दिंडीतील किमान एक वारकरी विणेकरी स्वरूपात सहभागी करून घ्यावा ही विनंती करण्यात आली होती. वारकऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून विदर्भातील इतरही दिंड्यांना आषाढी वारीमध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त करून देण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले होते.

स्मरण पत्र पाठवले
विदर्भातील बऱ्याच दिंड्यांचे प्रतिनिधी विश्व वारकरी सेनेच्या संपर्कात असून, वेळोवेळी आषाढी वारीमध्ये आम्हाला संधी मिळेल की नाही अशी विचारणा करत असल्यामुळे आज पालकमंत्री यशोमती ठाकूर, विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूर, जिल्हाधिकारी अमरावती यांना स्मरण पत्र पाठवण्यात आलेला आहे.

संस्थान व पालकमंत्र्यांना विनंती
आई रुक्मिणी मातेच्या सोबत इतर संतांच्या पादुका पंढरपूरला गेल्या तर महाराष्ट्रा मधून हा एक ऐतिहासिक सोहळा निर्माण होऊ शकतो. म्हणून आम्ही विश्व वारकरी सेनेच्या वतीने केलेली ही विनंती कौंडण्यपूर संस्थान, पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि प्रशासनाने मान्य करावी अशी विनंती ह.भ.प. गणेश महाराज शेटे विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष यांच्यावतीने करण्यात आलेली आहे.

Kaudanyapur Dindi can go to Pandharpur Wari

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Navy Collision : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र इशारा

‘आज मुश्किल से बचे...’ शहनाज गिल बसलेलं विमान हवेत जोरात हलू लागलं, अभिनेत्री प्रचंड घाबरली, Viral Video

'सरकार चर्चा करायला तयार, शिवराळ भाषा आम्ही सहन करणार नाही'

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

Marathi News Live Updates : गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

SCROLL FOR NEXT