अकोला

Buldhana; सिंदखेडराजा उपनगराध्यक्षवर 15 नगरसेवकांचा अविश्वास प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

सिंदखेडराजा (जि.बुलडाणा) : राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असल्यामुळे स्थानिक राजकारणावरही त्यांचे परिणाम पडताना दिसत असून, आता याचे पडसाद स्थानिक नगरपालिकेच्या राजकारणावर पडत आहेत. सिंदखेडराजा नगरपालिकेत एकूण 17 नगरसेवक असून, त्यापैकी शिवसेनेचे नगराध्यक्ष लोकनियुक्त आहे. तर नगरसेवकांपैकी शिवसेना 7, राष्ट्रवादी 8, भाजप 1, अपक्ष 1 अशी पक्षीय बलाबल आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडी असल्यामुळे त्याचे पडसाद सिंदखेड राजा नगरपालिका सुद्धा पडले आहे. भाजपचे उपनगराध्यक्ष असलेले नंदाताई विष्णू मेहेत्रे यांच्यावर महाविकास आघाडीच्या 15 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. (No-confidence motion of 15 corporators against Sindkhedraja Deputy Mayor of Buldana)

नगराध्यक्ष सतीश तायडे यांच्या देखरेखमध्ये सर्व घडून येत असून, 31 मे ला संध्याकाळी 5 वाजता नगरपरिषदेला उपरोक्त पत्र प्राप्त झाले आहे. सदर पत्र प्राप्त झाल्यानंतर नगराध्यक्षांनी दहा दिवसाच्या आत विशेष सभा बोलावून महाराष्ट्र राज्य अधिनियम नगर परिषद नगर पंचायत 55 एक अ अन्वये सदरील सभा बोलावून सभागृहातील दोन तृतीयांश बहुमताने मंजूर होतो तसे झाल्यास उपनगराध्यक्ष वरील अविश्वास प्रस्ताव पारित होणार असल्याचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी सांगितले.

अविश्वास ठरावाचा नोटीसमध्ये म्हटले आहे की नंदाताई विष्णू मेहेत्रे यांच्याविरुद्ध पुढील कारवाईसाठी नगरपरिषदेच्या सभेत अविश्वास ठराव मांडू इच्छितो. कारण सदर उपनगराध्यक्ष यांनी वारंवार नगरपरिषदेच्या विकास कामात सहभाग न घेणे, विकास कामाची मुद्दाम तक्रार करणे व त्यामध्ये अडचण निर्माण करणे, शहरांमधील विकास कामे न होऊ देणे, इतर सदस्यांना विश्वासात न घेणे, मनमानी कारभार करून एकतर्फी निर्णय घेणे, नगर परिषदेच्या प्रशासकीय कामात मुद्दाम दखल घेण्याबाबत वस्तुस्थिती खरी व बरोबर असून यामुळे नगर परिषद उपाध्यक्ष नंदा विष्णू मेहेत्रे यांच्यावर अविश्वास मांडण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करावे करिता विशेष सभा बोलण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.

अविश्वास ठराव मधील शिवसेना व राष्ट्रवादी 15 नगरसेवकांमध्ये शिवसेना भीमा पंडित जाधव, राजेश एकनाथ आढाव, दीपाली योगेश मस्के, भिवसन एकनाथ ठाकरे, बालाजी नारायण मेहेत्रे, सुमन प्रकाश खरात, ज्योती बाळू मस्के तर राष्ट्रवादी नगरसेवक रूखमणबाई राधाची तायडे, श्रीमती चंद्रकला मंचाची तायडे, गणेश शिवाजी झोरे, राजेश दत्तू आप्पा बोंद्रे, हजरा काजी शेख अजीम गफार, बबन साहेबराव मस्के, सारिका शाम मेहेत्रे यांच्या स्वाक्षर्‍या नोटीसवर आहे. सिंदखेड राजा नगरपालिकेत राजकीय सत्ता बदलामुळे शहराच्या राजकारणात आता महा विकास आघाडीचे नगरपालिकेत सत्ता परिवर्तन होत असल्याचे चित्र पाहायला दिसून येत आहे.

संपादन - विवेक मेतकर

No-confidence motion of 15 corporators against Sindkhedraja Deputy Mayor of Buldana

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT