akola
akola sakal
अकोला

अभिमानास्पद! महाराष्ट्र कन्या समीक्षाला ॲमेझॉनमध्ये नोकरी, १ कोटींचं पॅकेज

अनुप ताले

अकोला : सुप्त गुणांची पारख करून ‘समिक्षा’ने बालवयातच क्रीडा क्षेत्रात (sports) पाऊल टाकले; नव्हे तर, स्विमिंग (swimming)तसेच ट्रायथलॉन खेळामध्ये राष्ट्रीयस्तर सुद्धा गाजविला. मात्र, अभ्यासात दुर्लक्ष होत असल्याची जाणीव होताच वेळीच शिक्षणात स्वतःला झोकून देत संगणक क्षेत्रात उंच भरारी घेतली. सुप्तगूण आणि अभ्यासाची सांगड घालीत ती आता यूएसएमधील ॲमेझॉनमध्ये (job on amazon company ) एक कोटी रुपयांहून अधिक पॅकेजसह तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे.

समिक्षाचा जन्म अकोल्याचाच. तिचे कुटुंब तसे शिक्षणप्रिय; वडील ॲडवोकेट तर, आई सुद्धा उच्चशिक्षित. समिक्षाचे वडील ॲड. संजय पोटे यांना पुण्यामध्ये स्थलांतरित व्हावे लागले. समिक्षाला पुण्यातील प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आले व पदवीपर्यंतचे शिक्षण तिने पुण्यातच पूर्ण केले. समिक्षाचा सुरुवातीपासूनच खेळ आणि इतर सह-अभ्यासक्रमांकडे जास्त कल होता. त्यामुळे तिची आवड लक्षात घेऊन तिच्या पालकांनी तिला पाचवीत असताना एका स्विमिंग क्लबमध्ये दाखल केले. ती दररोज आवडीने दोन तासापेक्षा अधिक वेळ सराव करायची. त्यामुळे स्विमिंगमध्ये तिचे नैपुण्य वाढू लागले परंतु, अभ्यासात दुर्लक्ष होऊ लागले.

इयत्ता सातवीमध्ये असताना तिला तिच्या वयोगटात जलतरणात पहिले जिल्हास्तरीय पदक मिळाले. त्यामुळे तिचा आत्मविश्वास दृढ झाला आणि तिने अजून मेहनत करायला सुरुवात केली. ट्रायथलॉन खेळासाठी देखील तिने सराव सुरू केला. ट्रायथलॉन खेळात, खेळाडूला पोहणे, धावणे आणि सायकलिंगचा क्रम सतत करावा लागतो. हा सर्वात कठीण खेळांपैकी एक आहे आणि सहभागींना खडतर प्रशिक्षण घ्यावे लागते. समिक्षा आठवीत असताना तिच्या वयोगटात जलतरणात पुणे जिल्ह्यात प्रथम आली आणि महाराष्ट्रात सुद्धा प्रथम आली. समिक्षाने महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तसेच इतर राज्यांमध्ये अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. तिला ॲक्वाथलॉनमध्ये राष्ट्रीय मानांकन मिळाले.

वर्षभर त्या सर्व स्पर्धा खेळूनही आणि कठोर नॉन-स्टॉप सराव करून, ती शालेय परीक्षेत सरासरी गुण राखत होती. बोर्डाच्या परीक्षेच्या अवघ्या तीन महिन्यांपूर्वी झालेल्या शाळेच्या प्रिलिममध्ये समिक्षा आधीच गणितात नापास झाल्यामुळे बोर्डाच्या परीक्षेत नापास होण्याची भीती शाळेतील शिक्षकांना होती. समिक्षानेही शिक्षकांचा सल्ला महत्त्वपूर्ण असल्याचे निश्‍चित करीत अभ्यासासाठी खेळ आणि खेळांचा त्याग करायचे ठरविले. पुढे विज्ञान शाखेत शिकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. तिने उच्च माध्यमिक बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि संगणकासाठी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. तिची पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेतील नामांकित विद्यापीठात निवड झाली आणि तिच्या कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षी तिची एक कोटीहून अधिक पगाराच्या पॅकेजसह यूएसएमधील ॲमेझॉनमध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणून निवड झाली आहे.

मुलांसाठी प्रेरणादायी उदाहरण

एक मुलगी जिचे सुप्त गुणानुसार क्रीडा क्षेत्रात(sports) विशेष स्वारस्य असल्याने ती इयत्ता दहावीतच राष्ट्रीय स्तरावरील दोन खेळांमध्ये भाग घेण्यासाठी पोहोचली होती. मात्र, खेळाकडे अधिक वेळ द्यावा लागत असल्याने अभ्यासात दुर्लक्ष होते गेले. योग्यवेळी शिक्षकांनी तिला त्याची जाणीव करून दिली. तिनेही अभ्यासाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षणात चित्त एकाग्र केले व जिद्द, चिकाटीने अभ्यासातही यश संपादीत करून यूएसएमधील ॲमेझॉनमध्ये(us company amazon) कोटीहून अधिक पगाराचे पद मिळविले.

समाजातील सर्वच मुला-मुलींसाठी ही एक प्रेरणादायी उदाहरण असून, याप्रमाणे सर्वच मुले आत्मनिर्भरता, संयम, दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमातून(Hard work) सुप्त गुण व अभ्यासाची सांगळ घालत करिअर घडवू शकतील. मात्र, त्यांना पालकांनी, शिक्षकांनी योग्यवेळी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे मत समिक्षाचे वडील ॲड. संजय पोटे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT