baya bird nest in akola.jpg 
अकोला

तुले देले रे देवानं दोन हात दहा बोटं...कोरोनामुळे खचू नका! या सुगरणीच्या खोप्यात दडलयं नवनिर्मितीचं गुपीत

सागर कुटे

अकोला : अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने, झोका झाडाले टांगला, या बहिणाबाईंनी चौधरींनी सुगरणीच्या कौशल्याचे वर्णन केले आहे. बहिणाबाईंनी याच कवितेच्या माध्यमातून मोठा मौलीक संदेश दिलेला आहे.

एकीकडे जगभर कोरोनाने हैदोस घातला असून, अनेक देश उद्योजक व्यापारी संस्था इतकेच काय तर सामान्य माणूसही हतबल झालेला आहे. मात्र, याच कवितेमध्ये ‘तुले देले रे देवानं दोन हात दहा बोटं’ या ओळीतून त्यांनी माणसाला खचून न जाता सुगरणीसारख्या छोट्या पक्षाने स्वकर्तृत्वाने जसे आपले घरटे विणले त्याच प्रमाणे माणसाने स्वतः नवनिर्मितीची तयारी ठेवावी.

आईच्या जीवाची आपल्या लेकरासाठी होणारी घालमेल, माया, ममता, काळजी बहिणाबाईंनी चौधरींच्या कवितेतील पंक्ती जीवाला घोर लावून जातात. ज्या सुगरण पक्षावरून ही कविता बहीणाबाईंना सुचली ते दिसायला जसे मोहक असतात तशीच त्यांची कलाकुसरही सुबक असते. सुगरणमध्ये नर पक्षी घरटी विणतो. मादी पक्षी त्याचे कौशल्य पाहून निरखून पाहतात व ते ठिकठाक आहे की नाही हे पाहून त्यात रहायच की नाही हे त्या ठरवतात. एक घरटे विणण्यासाठी सुगरण पक्षाला सुमारे 14 ते 17 दिवस लागतात.

त्याच्या साहित्यासाठी तो 500 ते 600 वेळा चकरा मारतो. पिलांना वाऱ्याचा त्रास होऊ नये म्हणून घरट्याला आतून सुगरण मादी किंचित चिखल लावते. हे सुगरण पक्षी घरटी विणतात त्यावरून मला नेहमी प्रश्न पडतो हत्ती, घोडे, बैलांसारखे मोठ्या शरीराच्या प्राण्यांना आपले स्वतःचे घर बनवता येत नाही पण हे चिमुकले पक्षी आपल्या चोचीत गवत-पात्या गोळा करून सुंदर विणीचा खोपा तयार करतात. झाडाच्या फांदीला धरून ह्यांच्या पायाभरणीला (विणण्याला) सुरुवात होते. त्या पक्षाची धडपड बहिणाबाईंनी आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडली आहे. कितीही संकटे आले तरी नागरिकांनी खंबिरपणे आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत रहावी. 

याच कवितेतील ओव्या आताच्या परिस्थितीत तंतोतंत लागू पडतात. जगभर कोरोनाने हैदोस घातला आहे. अनेक देश, उद्योजक, व्यापारी, संस्था इतकेच काय तर सामान्य माणूसही हतबल झालेला आहे. लॉकडाउनमुळे गेले अडीच महिने नैराश्‍येचे गेले. मात्र, याच कवितेमध्ये ‘तुले देले रे देवानं दोन हात दहा बोटं’ या ओळीतून त्यांनी माणसाला खचून न जाता सुगरणीसारख्या छोट्या पक्षाने स्वकर्तृत्वाने जसे आपले घरटे विणले त्याच प्रमाणे माणसाने स्वतः नवनिर्मितीची तयारी ठेवावी असा संदेश दिला आहे. निसर्ग हा मनुष्याचा खरा मार्गदर्शक असतो. त्याचप्रमाणे सुगरण देखील आपल्याला नव्या सुरुवातीची वीण बांधायला सांगत आहे. त्यामुळे चार लॉकडाउनंतर आता अनलॉक एक मध्ये प्रत्येकाने पुन्हा आपल्या व्यवसायाकडे वळत आहे. त्यामुळे आता सर्वांनी पुन्हा जोमाने कामाला लागायची गरज आहे.

सुगरण पक्ष्यांची संख्या झाली कमी
पूर्वी मोठ्या प्रमाणात आणि सहजगत्या आढळणाऱ्या सुगरण पक्ष्यांची संख्या गेल्या काही वर्षांत घसरणीला लागली असल्याचे पक्षीतज्ज्ञांच्या लक्षात आले आहे. लोकसंख्येतील वाढ आणि विकास, यामुळे ही संख्या कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT