अकोला

रस्त्यांवर तुफान गर्दी; यंत्रणा उदासिन, निर्बंध तुडवले पायदळी!

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना (Corona) संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. परंतु रविवारी (ता. २३) महानगरात उसळलेल्या गर्दीमुळे नागरिकांनीच टाळेबंदीचे निर्बंध पायदळी तुडवल्याचे दिसून आले. मुख्य रस्त्यांवर झालेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली तर भाजीपाला व फळ बाजारात खरेदीसाठी नागरिकांची झुंबळ उडाली. बाजारात बिगर अत्यावश्यक सेवेची दुकाने सुद्धा बिनधास्त सुरू असल्याचे दिसून आले. या स्थितीची माहिती असल्यानंतर सुद्धा शासकीय यंत्रणा मात्र मूकदर्शक झाल्याचे निदर्शानस आले. (Storm surge on the streets of Akola; Restrictions trampled on!)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे राज्यातील इतर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कमी होत असतानाच अकोला जिल्ह्यासह राज्यातील इतर १५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. त्यामुळे महसूल मंत्र्यांनी संंबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी व्हिडीओ संवाद साधत निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे व टेस्टींग वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या.

सदर ऑनलाईन आढावा बैठकीनंतर रविवारी (ता. २३) शहरातील बेफिकीरीचा नजारा समोर आला. रस्त्यांवर सकाळपासून गर्दी झाल्याचे दिसून आले. टाळेबंदी शिथिल करुन जिल्हाधिकाऱ्यांनी गत आठवड्यात काही बाबी अटी-शर्तींसह दुकाने-सेवा सुरू ठेवण्याची मुभा दिल्यानंतर त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे यावेळी दिसून आले. बिगर अत्यावश्यक सेवेची दुकाने, कपडा विक्री दुकाने, गृह उपयोगी साहित्या विक्री दुकानांसह रस्त्यांवर हात ठेल्यावाल्यांनी सुद्धा सकाळी ११ वाजेपर्यंत त्यांची दुकाने सुरू ठेवून नियमांना ठेंगा दाखवला.

कोठे काय आढळले

  • - मोहम्मद अली रोडवर सकाळी ११ वाजता वाहनकांची एकच गर्दी झाली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याचे दिसून आले. या ठिकाणी वाहनांची संख्या अधिक झाल्याने जाम लागला होता.

  • - गांधी रोडवर बिगर अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू होती. कपडा व्यावसायिकांसह काही सोना चांदी विक्रेत्यांनी त्यांची दुकाने शटर अर्धवट सुरू ठेवून सुरू ठेवली होती. काही ठिकाणी स्टीलचे भांडे विकणाऱ्यांनी सुद्धा दुकाने सुरू ठेवल्याचे दिसून आले. बांगळ्या विकणाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केले.

  • - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यवगृह ते फतेह अली चाैक, गांधी चाैक ते ताजनापेठ दरम्यान फळ, भाजाची दुकाने भाटे क्लब मैदानावर सुरू ठेवणे अपेक्षित असल्यानंतर सुद्धा सदर आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले.

  • - जुने शहरातील श्रीवास्तव चाैक, डाबकी राेड पाेलिस ठाण्याच्या मागे फळ- भाजीची दुकाने रस्त्यावरच थाटण्यात आल्याचे दिसून आले. यावेळी सुरक्षित अंतराच्या नियमासह इतर नियमांचे उल्लंघन झाल्याचेही निदर्शनास आले.

  • - जयहिंद चाैकात स्वीटमार्ट, जनरल स्टाेअर्सचे अर्धेशटर उघडे हाेते. डाबकी राेडवरही तयार कापड, बुट, इलेक्ट्राॅनिक्ससह अन्य बिगर जीवनावश्यक साहित्य विक्रीची दुकाने सुरु हाेती.

  • - राऊत वाडी, बारा ज्याेर्तिलिंग मंदिर राेडवर माेबाईल फाेन, ब्युटीपार्लर सुरु हाेते.

भाजीपाला खरेदीसाठी प्रचंड गर्दी

शहरातील गांधी रोड वरील जैन मंदिराजवळ भरणाऱ्या बाजारात नागरिकांनी भाजीपाला खरेदीसाठी तुडूंब गर्दी केली. या ठिकाणी एकाचा गल्लीमध्ये बाजारा भरत असल्याने सुरक्षित अंतराच्या नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून आले. काही वाहनाचालक दुचाकी घेवून सुद्धा भाजीपाला खरेदीसाठी पोहचल्याने नागरिक अक्षरः एकमेकांनी धक्का देत होते.

संपादन - विवेक मेतकर

Storm surge on the streets of Akola; Restrictions trampled on!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT