The war between the Marathas and the British took place at Sirsoli in Akola district in 1803. Patriots pay homage to the warriors
The war between the Marathas and the British took place at Sirsoli in Akola district in 1803. Patriots pay homage to the warriors 
अकोला

अकोला जिल्ह्याील सिरसोली येथे मराठा व इंग्रजांमध्ये १८०३ मध्ये झाले होते युद्ध, युद्धभूमीवर राष्ट्रप्रेमींनी वाहली शूरविरांना श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेेवा

तेल्हारा (जि.अकोला): सिरसोली येथे मराठा इंग्रजां दरम्यान झालेल्या युद्धामध्ये अठरा पगड जातीतील सैनिक जिवाची पर्वा न करता लढले होते. या युद्धात मायभूमीच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीर योद्धांना दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवारी (ता.२९) श्रद्धांजली वाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने युद्धभूमीवर उपस्थिती होती.


अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील सिरसोली गावी (ता.२३ ते २९) नोव्हेंबर १८०३ मध्ये मराठा व इंग्रजांमध्ये फार मोठे युद्ध झाले होते. लाॕर्ड आर्थर वेलस्ली यांच्या उपस्थितित कॕप्टन केन हा इंग्रजी सैन्यांचे नेतृत्व करत होता. तर, मराठा सैन्यांचे नेतृत्व मनोहर बापू भोसले करीत होते.

त्यांना विश्वासू शुरविर समशेरबहाद्दर सरदार, कर्ताजीराव जायले मदतीला होते. हे युद्ध जवळपास सहा दिवस चालले होते. इंग्रजांकडे अत्याधुनिक शस्त्रे असूनही मराठ्यांनी तलवारीच्या जोरावर इंग्रज सैन्य कापून काढले होते.

कर्ताजीराव जायले यांनी स्वतःचे बलीदान देऊन कॕप्टन केनला ठार मारले. अठरा पगड जातीतील सर्व सैनिक जिवाची पर्वा न करता लढले व अतुलनीय शौर्य गाजविले. अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक अनंतराव गावंडे यांनी यावेळी दिली.

यावेळी पुरुषोत्तम लाजूरकर यांनीअको शौर्य गीत सादर केले. अकोट न.पा. सदस्य मनीष कराळे, विवेक बोचे, श्रीकांत गायगोले, अवी गावंडे, राजू नागमोते, उमेश जायले, शिवशंकर जायले, पिंटू वडतकार, पुरुषोत्तम मोहोकार, विष्णू झामरे, ऋषिकेश खोटरे, संतोष ताकोते, वैभव आखरे, अविनाश सावरकर, संदीप कुलट, अमर भागवत, प्रवीण सिरस्कार, अभिलाष निचळ, नंदू आढाऊ, योगेश वाकोडे, अनिल बिहाडे, विजय जायले, राम म्हैसने, राजू गावंडे, रामदास चौखंडे, विजय उगले, राजेश सगने, प्रशांत काईंगे, अरुण गावंडे, वैभव चिकटे, विजय बेदरकर, संजय खोटरे, संदीप गावंडे, पप्पू धंदारे, गणेशा आंग्रे, मुरली नहाटे, बापूराव नहाटे, विनायकराव नहाटे, अमोल नहाटे कुणाल कुलट, सचिन शिंदे, किशोर देशमुख, निखील कुलट, सौरव इंगळे, विजय इंगोले, शक्ती गीते, राहुल काळे, प्रवीण भगत, प्रयत्न कराळे, नंदू गेबड आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

 
मायभूमीच्या प्रेमाची ज्योत
इतिहास अभ्यासक प्रा. संतोष झामरे यांनी छत्रपतीं शिवाजी महाराजांनी मायभूमीच्या प्रेमाची ज्योत प्रत्येक नागरिकाच्या मनात जागृत केली होती. त्याची प्रचिती सिरसोली येथील युद्धात पाहावयास मिळाली असे साद्यंत वर्णन त्यांनी केले. संघर्ष सावरकर व संदीप बोबडे यांनी युद्धभूमीच्या इतिहासाबद्दल माहिती दिली.

(संपादन - विवेक मेतकर)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT