Gautam Adani  Sakal
अर्थविश्व

Adani Group News : अदानी समूहाचा काँग्रेसशासित सरकारसोबत मोठा करार; 'या' कंपनीतील 50% हिस्सा...

अदानी समूह नवीन वर्षात आणखी एक कंपनी ताब्यात घेणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Adani Group News: अदानी समूह नवीन वर्षात आणखी एक कंपनी ताब्यात घेणार आहे. अदानी रिन्यूएबल एनर्जीने (Adani Green Energy) यावर्षी ऊर्जा कंपनीतील 50 टक्के हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा करार 15 कोटी रुपयांमध्ये पूर्ण होणार आहे. या कराराचा खुलासा करताना अदानी समूहाने सांगितले की, हा करार एस्सेल सोलर एनर्जी कंपनीसोबत केला जात आहे.

अदानी समूह आता राजस्थानच्या एस्सेल सोलर एनर्जी कंपनीतील 50 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. अदानी रिन्यूएबल एनर्जी होल्डिंग टू लिमिटेड हे अदानी ग्रीन एनर्जीचे एक विभाग आहे.

50 टक्के शेअर्स राजस्थान सरकारकडे :

अदानी ग्रीन एनर्जीने शेअर बाजाराला सांगितले की, त्यांच्या उपकंपनीने 17 जानेवारी 2023 रोजी एस्सेल इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडसोबत करार केला आहे. उर्वरित 50 टक्के समभाग राजस्थान सरकारकडे राहतील.

अदानी रिन्यूएबल एनर्जी होल्डिंग टू लिमिटेडचा राजस्थानमध्ये 750 मेगावॅट क्षमतेचा सोलर पार्क आहे. 2021-22 मध्ये त्याची उलाढाल 9.87 कोटी रुपये होती.

शेअर्समध्ये तेजी :

अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्सबद्दल सांगायचे झाले तर, गेल्या 5 ट्रेडिंग दिवसांमध्ये कंपनीचे शेअर्स10.52 टक्क्यांनी वाढले आहेत. या कालावधीत शेअरचे मूल्य 198.50 रुपयांनी वाढून 2,085.50 च्या पातळीवर पोहोचले आहे.

या स्टॉकची 52 आठवड्यांची विक्रमी पातळी 3,050.00 रुपये आहे आणि खालची पातळी 1,650.20 रुपये आहे.

अलीकडे झालेल्या राजस्थान इन्व्हेस्टर समिटमध्ये गौतम अदानी सहभागी झाले होते. पुढील 5 ते 7 वर्षांत राजस्थानमध्ये सुमारे 65,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

यामध्ये कंपनी राजस्थानमध्ये सिमेंट उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक करणार आहे. अदानी समूहाच्या या गुंतवणुकीमुळे राज्यात सुमारे 40,000 नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT