Cashless  Money Transfer
Cashless  Money Transfer esakal
अर्थविश्व

Cashless  Money Transfer : आता कोणत्याही अडथळ्याशिवाय हॉस्पिटलमध्येही होणार Anywhere Cashless उपचार!

Pooja Karande-Kadam

Cashless  Money Transfer : आता कोणत्याही ठिकाणी पैशांचा व्यवहार करताना अडथळे येत नाहीत. कारण, सगळे व्यवहार कॅशलेस झाले आहेत. त्यामुळे फसवणूक चोरी असे प्रकार थांबले आहेत. आता यात  भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांपैकी एक, तिच्या आरोग्य विमा पॉलिसी धारकांसाठी "कोठेही कॅशलेस" हे नवीनतम वैशिष्ट्य लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.

विमा उद्योगातील हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. या नवीन सुविधेअंतर्गत, ग्राहक कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधांचा लाभ घेऊ शकतात, जरी ते ICICI लोम्बार्डच्या हॉस्पिटलच्या विद्यमान नेटवर्कचा भाग नसले तरीही. यामध्ये, ग्राहकांना स्वतःच्या खिशातून कोणताही खर्च उचलावा लागणार नाही. “प्रत्येक ठिकाणी कॅशलेस” सुविधेला रूग्णालयाने कॅशलेस सुविधेची मान्यता दिली असेल.

एनीव्हेअर कॅशलेस सुविधा ही संबंधित रुग्णालयाच्या कॅशलेस सुविधेच्या मान्यतेच्या अधीन आहे. या सुविधेचा लाभ मिळण्यासाठी विमाधारकाला रुग्णायात भरती होण्यासाठी कंपनीला २४ तास आधी सुचित करावे लागणार आहे. ते रुग्ण, पॉलिसीची माहिती, हॉस्पीटलचे नाव, उपचार, उपचार करणारे डॉक्टर इत्यादींबद्दल मूलभूत माहिती विमा कंपनीला कळवू शकतात.

ही नवी सुविधा आयएल टेक केअर ॲपच्या सर्व्हिस वुई ऑफर या विभागातून सुध्दा विमाधारक प्राप्त करु शकतात. ही नवी सुविधा सुरवातीला प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली होती, परंतु आता भारतभर आयएल टेक केअर अॅपच्या माध्यमातून उपलब्ध आहे.

ग्राहकांच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास सध्याच्या स्थितीत रुग्णालयात सुरुवातीला भरावे लागणारे डिपॉझिट, सर्व खर्चाची रक्कम अदा करणे, बिलांच्या मूळ पावत्या जमा करणे आणि अगदी बारीकसारीक बाबी समजून घेण्यासाठी विमा कंपनीबरोबर समन्वय साधणे आदी कटकटीतून एनीव्हेअर कॅशेलेस सुविधेमुळे ग्राहकांची मुक्तता झाली आहे.

रुग्णालयात भरती ते डिस्चार्ज या प्रवासातील सर्व सोपास्कारांचा विमाधारकाला विनाअडचणी आणि सहजसोपा अनुभव ही नवीन सुविधा प्रदान करते. तसेच विमाधारकाला नजीकचे किवा शिफारस करण्यात आलेले रुग्णालय निवडण्याची संधी ही नवीन सुविधा देते.

त्यामुळे उपचाराच्यावेळी विम्याबाबतच्या बारीकसारीक बाबींवर वेळ खर्च करण्याऐवजी आपल्या कुटूंबाच्या स्वास्थाकडे लक्ष केंद्रीत करण्यास वाव देते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT