अर्थविश्व

३१ मार्चपर्यंत ७ महत्त्वाची काम उरका नाहीतर, मुदत संपल्यास...

सकाळ डिजिटल टीम

मार्च महिना हा नेहमी महत्त्वाचा असतो कारण या महिन्याच्या शेवटच्या तारखेला आर्थिक वर्ष संपते. दरम्यान, काही असे खूप महत्त्वाचे काम असतात ज्यांची मुदत ३१ मार्च पर्यंत आहे. जर तुम्ही दिलेल्या मुदतीच्या आधी ही कामे नाही केली तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. केंद्र सरकारने विविध स्किम आणि काही नियमांचे पालन करण्याची मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढविली आहे. चला जाणून घेऊ या ३१ मार्चच्या आधी कोणती कामे उरकली पाहिजे.

आर्थिक वर्ष 2019-20 साठी ITR व्हेरिफेकेशन

इनकम टॅक्स डिपार्टमेंट(IT Depaertment)नुसार, ज्यांनी आतापर्यंत आर्थिक वर्ष २०१९-२० मधील आपला इनकम टॅक्स रिटर्नचे (Income Tax Return)व्हेरफिकेशन (itr verification date केले नाही , ते करदाता २८ फेब्रुवारी २०२२मध्ये आपली आयटीआरचे व्हेरिफेकशन करू शकता.

या तारखेच्या आधी जमा करा लाईफ सर्टिफिकेट

सरकारने पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र (life certificate for pensioners)जमा करण्याची शेवटची तारखी ३१ डिसेंबर २०२१ वरून २८ फेब्रुवारी केली आहे. आता पेन्शनर्स आपली लाईफ सर्टिफिकेट २८ फेब्रुवारी २०२२पर्यंत जमा करू शकतात. जीवन प्रमाणपत्र देशातील पेन्शनधारकांसाठी त्यांचा मासिक भत्ता म्हणजेच पेन्शन कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळावी यासाठी हे एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे.

आर्थिक वर्ष २०२२-२१ मध्ये आगाऊ रक्कम भरण्याची शेवटची तारीख

वित्त वर्ष २०२१-२२ साठी आगाऊ टॅक्स भरण्याची अंतिम तारिख १५ मार्च २०२२ आहे. जर तुम्ही इनकम टॅक्स चौकटीत येत असाल तर तुम्हाला वेळेत आपला टॅक्स भरावा लागेल. तेच जर तुम्हाला कोणतीही व्यक्ती या तारखेला अॅडवान्स टॅक्स भरले नाही तर धारा २३४ए/२३४ बी अंतर्गत व्याज लागू शकता. लक्षात ठेवा वरिष्ठ नागरिकांना आगाऊ इनकम टॅक्स भरण्यासाठी सुट देण्यात आली आहे.

पॅनकार्ड करा आधारसोबत लिंक

जर तुमचा पॅन कार्ड आधारसोबत लिंक केले (PAN Aadhaar liking deadline) नसेल तर तुम्ही या वर्षी ३१ मार्च २०२२पूर्वी आधी हे काम करू शकता. जर या तारखेच्या आधी आपला पॅन कार्ड नंबर आधारसोबत जोडला गेला नसेल तर केवळ तुमचा पॅन निष्क्रिय होईल आणि त्यासोबत तुम्हाला १००० रुपये दंड भरावा लागेल.

उशीरा ITR भरणे

जर तुम्ही ३१ डिसेंबर २०२१ या आर्थिक वर्ष २०२०-२१साठी आपला आयटीआर भरू शकला नसाल तर तुमच्याकडे आता संधी आहे. तुम्ही ३१ मार्चपर्यंत बिलेटेड रिटर्न भरू शकता. १ जानेवारी २०२२पासून आयकर रिर्टन भरला तर आणि ३१ मार्च २०२२ला त्याला प्रलंबित आयटीआर म्हटले जाईल. उशीरा आईटीआर भरण्यासाठी ५००० रुपये ( ५ लाख रुपये पर्यंत एकूण आयकरसाठी १००० रुपये) दंड लावला जाईल.

आर्थिक वर्ष २०२१-२२मध्ये टॅक्स सेव्हिंग अभ्यास

जर तुम्ही आर्थिकवर्ष २०२१-२२मध्ये जुना टॅक्स व्यवस्थेचा पर्याय निवडला असेल तर तुम्हाला ३१ मार्च २०२२पर्यंत आपला टॅक्स बचत अभ्यास पूर्ण केला आहे का याची खात्री करा. याचा अर्थ असा कीस करदात्यांना याची खात्री करावी लागले की त्यांनी सर्व कलमांअंतर्गत उपलब्ध डिडक्शनचा फायदा घेतला आहे. नियमांनुसार साधारण उपलब्ध डिडक्शनमध्ये कलम ८०सी मध्ये १.५ लाख रुपयांपर्यंत, एनपीएस योगदानासाठी कलम ८० सीसीडी(१बी) अंतर्गत ५०,००० रुपये टॅक्सचा लाभ, चिकित्सा विमा प्रीमियम इत्यादी ५०,००० रुपय टॅक्स देखील समाविष्ट आहे.

बँक KYC

भारतीय रिझर्व बँकेने (RBI) KYC पुर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२१ पासून वाढवून ३१ मार्च २०२२पर्यंत केली आहे. आरबीआयने आर्थिक संस्थावर चालू आर्थिक वर्ष २०२१-२२अंतर्गत KYC अपडेट करण्यासाठी काही कारवाई न करण्याचा सल्ला दिला आहे. KYC अंतर्गत ग्राहकांना त्यांचे पॅन कार्ड, पत्ता जसे की आधार, पासपोर्ट आदी, अपडेट करा असे बँकेने सांगितले आहे. त्यासोबत सध्याचा फोटो आणि इतर माहिती देखील मागवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

Hajipur Lok Sabha Result: वर्चस्वाच्या लढाईत वडिलांची जागा राखण्याचे चिराग यांच्यासमोर आव्हान

Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर

Shripad Joshi: बारावीपर्यंत मराठी कम्पलसरी करायला टाळाटाळ का? साहित्यिक श्रीपाद जोशींचा सवाल

SCROLL FOR NEXT