online-payment
online-payment 
अर्थविश्व

एक जानेवारीपासून Online Paymentच्या नियमात होणार बदल, जाणून घ्या कोणते

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही क्रेडिट किंवा डेबिड कार्डचा वापर करत असाल तर जाणून घ्या नवीन वर्षापासून ऑनलाईन कार्ड पेमेंटच्या नियमात बदल होणार आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या सुरक्षेचा विचार करुन हा बदल करण्यात येत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) हे नियम लागू करणार आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑनलाईन पेमेंटला आणखीन सुरक्षित बनवण्यासाठी सर्व संकेतस्थळ आणि पेमेंट गेटवेद्वारा स्टोर करण्यात आलेल्या ग्राहकांचा डेटा हटवणे आणि त्यांच्या ठिकाणाहून व्यवहार करण्यासाठी एन्क्रिप्टेड टोकनचा उपयोग करण्यास सांगितले आहे.

कार्डचा तपशील साठवला जाणार नाही

- नवीन नियमांनुसार ऑनलाईन शाॅपिंग आणि डिजिटल पेमेंट आता मर्चंट वेबसाईट किंवा अॅप तुमच्या कार्डचे तपशील स्टोर करु शकणार नाही. आणि ज्या मर्चंट वेबसाईट किंवा अॅपवर तुमच्या कार्डचे तपशील आतापर्यंत स्टोर आहेत, तेथून ते डिलिट होईल. यामुळे नवीन वर्षात तुम्ही तुमच्या डेबिड-क्रेडिट कार्डने ऑनलाईन शाॅपिंग कराल किंवा एखाद्या पेमेंट अॅपवर डिजिटल पेमेंटसाठी वापर कराल तर कार्डचे तपशील स्टोर होणार नाही.

नवीन नियम काय म्हणतो (New Debit-Credit Card Rules)

- १ जानेवारी, २०२२ पासून ऑनलाईन पेमेंट करताना तुम्हाला एक तर १६ डिजिट असणाऱ्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नंबरसह कार्डचे पूर्ण तपशील टाकावे लागेल किंवा टोकनायझेशनच्या पर्याय निवडावा लागेल. आता पेमेंट अॅप किंवा ऑनलाईन शाॅपिंग प्लॅटफाॅर्मवर तुमचा कार्ड नंबर स्टोर होतो आणि तुम्ही केवळ सीव्हीसी आणि ओटीपी एंटर करुन पेमेंट करु शकता.

आरबीआयचे दिशानिर्देश

- आरबीआयने मार्च, २०२० मध्ये दिशानिर्देश जारी करताना म्हटले आहे, की व्यापाऱ्यांना डेटा सुरक्षा वाढवण्यासाठी आपल्या वेबसाईट्सवर कार्डची माहिती देण्यास परवानगी नसेल. आरबीआयने या विषयी सप्टेंबर २०२१ मध्ये नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत. त्याने कंपन्यांना वर्षाच्या शेवटीपर्यंत नियमांच्या पालन करणे आणि त्यांना टोकनचा पर्याय देण्यास सांगितले होते. रिझर्व्ह बँकेने सर्व कंपन्यांना १ जानेवारी, २०२२ पासून आपल्या सिस्टिममधून साठवलेले क्रेडिट आणि डेबिट कार्डचा तपशील हटवण्याचा आदेश दिला होता.

बँका करतायत अलर्ट

- काही बँका आपल्या ग्राहकांना नवीन नियमांविषयी अलर्ट करायला सुरुवात केली आहे. एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) आपल्या ग्राहकांना म्हटले आहे, की अधिक कार्ड सुरक्षिततेसाठी आरबीआयच्या नवीन मॅनडेटनुसार मर्चंट वेबवाईट किंवा अॅपवर सेव्ह तुमच्या एचडीएफसी बँक कार्डचे तपशीस १ जानेवार २०२२ पासून मर्चंटद्वारा डिलिट केली जाईल. प्रत्येक पेमेंटच्या वेळेस ग्राहकांना एक तर कार्डचे तपशील द्यावे लागेल किंवा टोकनायझेशन सिस्टिमचा अवलंब करावा.

काय आहे टोकनायझेशन

- टोकनायझेशनच्या मदतीने कार्डधारकाला आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे पूर्ण तपशील शेअर करावे लागत नाही. टोकनायझेशन वास्तविक कार्ड नंबरचे एक पर्याय कोडच्या माध्यमातून रिप्लेसमेंट होते. या कोडलाच टोकन म्हणतात. टोकनायझेशन प्रत्येक कार्ड, टोकन रिक्वेस्ट आणि मर्चंटसाठी युनिक असेल. टोकन क्रिएट झाल्यावर टोकनाईज्ड कार्ड डिटेल्सला कार्ड नंबरच्या जागी वापरले जाऊ शकते. ऑनलाईन पेमेंटसाठी ही जास्त सुरक्षित मानले जाते.

सध्याचे नियम काय आहे?

- जेव्हा तुम्ही कार्ड, डेबिट किंवा क्रेडिटचा उपयोग करता, तेव्हा तुम्हाला कार्डचे १६ नंबर, कार्डची समाप्ती तारीख, सीव्हीसीसह वन टाईम पासवर्ड या पिनसारखी माहितीचा वापर करावा लागतो. कोणतेही ट्रांझक्शन तेव्हाच होते जेव्हा सर्व तपशील योग्य भरले असतील.

१ जानेवारीपासून हे होणार

- १ जानेवारी नंतर तुम्ही ऑनलाईन पेमेंट कराल तर तुम्हाला प्रमाणिकरणासाठी वेगळी सहमती(Additional Factor Of Authentication -AFA) द्यावी लागेल. एकदा सहमती झाल्यानंतर तुम्ही तुमच्या कार्डच्या सीव्हीसी आणि ओटीपी नोंदवून पेमेंट पूर्ण कराल. जेव्हा तुमचे कार्डचे डिटेल एन्क्रिप्टेड पद्धतीने नोंदविली जाते तेव्हा डेटाबरोबर छेडछाड किंवा धोका कमी होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT